शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! शॉर्ट घालून फिरल्याने पुण्यात शेजाऱ्यांकडून इंजिनिअर तरुणींना चपलेने मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2022 11:24 IST

चंदननगर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील रक्षकनगर मध्ये बुधवारी ही घटना घडली...

पुणे : पेईंग गेस्ट म्हणून राहणाऱ्या आयटी इंजिनीयर तरुणी शॉर्ट घालून फिरत असल्याच्या कारणावरून शेजारी राहणाऱ्या महिलेने त्यांना चपलेने मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चंदननगर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील रक्षकनगर मध्ये बुधवारी ही घटना घडली. याप्रकरणी एका 32 वर्षीय महिलेने फिर्याद दिली असून एकाच कुटुंबातील सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या चंदनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहण्यास आहे. त्यांच्याकडे तीन तरुणी पेईंग गेस्ट म्हणून राहतात. आयटी इंजिनिअर असलेल्या या मुली खराडी येथील एका खाजगी कंपनीत नोकरी करतात. दरम्यान या तरुणी अधून-मधून शॉर्ट्स घालून घराबाहेर पडत असतात. या तरुणांनी शॉट घालने शेजारी राहणाऱ्या कुटुंबियांना खटकत असे. यावरून त्यांनी फिर्यादी महिलेलादेखील विचारणा केली होती. परंतु त्यांनी काय घालावे काय घालू नये हा त्यांचा प्रश्‍न असल्याचे फिर्यादीने त्यांना सांगितले होते. 

दरम्यान याच कारणावरून शेजारी राहणाऱ्या 55 वर्षीय महिलेने फिर्यादीच्या घरात घुसून त्यांना वाईट वाईट शिवीगाळ केली आणि हाताने मारहाण देखील केली. तसेच शॉर्ट घालून घराबाहेर फिरणार्‍या आयटी इंजिनियर मुलींना देखील चपलेने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चंदन नगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे करत आहेत. 

टॅग्स :PuneपुणेChandan Nagarचंदननगरchandan nagar policeचंदननगर पोलीसCrime Newsगुन्हेगारी