शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

देवरायांकडे दुर्लक्ष पर्यावरणासाठी घातक : डॉ. माणिक फाटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 12:42 IST

देवरायांबद्दल सर्वसामान्य व्यक्तींना माहिती विचारली तेव्हा त्यांच्याकडून अतुल कुलकर्णी यांच्या देवराई सिनेमाचे नाव सांगण्यात येते. इतका अंधार या देवरायांविषयी समाजात पसरलेला आहे.

ठळक मुद्देपुणे जिल्ह्यात एकूण तीनशे ते साडेतीनशे देवराईविविध ऋतुंमधील देवरायांचे लोभस रुप 

दीपक कुलकर्णी पुणे : देवाच्या नावाने जंगलाचा तुकडा राखून ठेवण्यामागे पर्यावरण रक्षणाचीच भूमिका होती. त्यातूनच देशात देवराया बहरल्या होत्या. परंतु, सध्या देवरायांकडे होणारे दुर्लक्ष पर्यावरणदृष्टया घातक असल्याचे मत देवराईच्या अभ्यासक डॉ. माणिक फाटक यांनी व्यक्त केले. संपूर्ण भारतात आजच्या स्थितीला देवरायांचे गाढे अभ्यासक डॉ. के. पी. मल्होत्रा यांच्या मते जवळपास अंदाजे दीड लाख देवराई अस्तित्वात आहे. महाराष्ट्रात दहा हजार आणि पुणे जिल्ह्यात एकूण तीनशे ते साडेतीनशे देवराई आहे. सावंतवाडी ते रत्नागिरी या परिसरात एकूण साडेआठशे तर वेल्हा आणि तोरणा गडाच्या पायथ्याशी तीस ते चाळीस देवराई उपलब्ध आहेत. डॉ. फाटक म्हणाल्या, देवरायांबद्दल सर्वसामान्य व्यक्तींना माहिती विचारली तेव्हा त्यांच्याकडून अतुल कुलकर्णी यांच्या देवराई सिनेमाचे नाव सांगण्यात येते. इतका अंधार या देवरायांविषयी समाजात पसरलेला आहे. गेली कित्येक वर्ष या देवराया फक्त वनस्पती शास्त्रापुरताच मर्यादित होत्या. परंतु, १९७० च्या दशकात वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. वा. द. वर्तक व डॉ. माधव गाडगीळ यांनी देवराईंबद्दल शास्त्रीय दृष्टीकोनातून अभ्यास सुरु केला. त्यासाठी त्यांनी १९८९ साली महाराष्ट्र वृक्ष संवर्धिनी या संस्थेची स्थापना केली. त्यांच्या माध्यमातून देवराईविषयीचे एक एक रहस्य समोर येऊ लागले. या देवरायांना प्रादेशिक प्रांत अथवा तिथल्या रहिवासी लोकांनी विविध नावे बहाल केली आहेत. उदा. कोकणात देवराहाटी, महाराष्टात देवराई, कर्नाटकात देवबन, राजस्थानमध्ये देवमाया यांसारख्या नावांचा त्यामध्ये समावेश आहे. या देवराईचे क्षेत्र एकाझाडापासून ते काही हेक्टर पर्यंत असू शकते. दापोली ते कुडाळ या परिसरातील एक देवराई तर १०० एकरपर्यंत पसरलेली आहे. देवराई आणि नेहमीचे जंगल यातला फरक आपण जाणून घ्यायला हवा. ज्या भागात पाण्याचा स्त्रोत आहे. त्याच्या अवतीभोवती वसलेले जंंगल म्हणजे देवराई. आजूबाजूच्या गावात पाणीटंचाई निर्माण झाली तर देवराईमधील बाराही महिने असलेला पाण्याचा स्त्रोत कामी आल्याचे अनेक ठिकाणी आढळून आल्याचेही त्यांनी सांगितले............................... विविध ऋतुंमधील देवरायांचे लोभस रुप ऋतुमानाप्रमाणे देवराईत आढळणारे पक्षी , प्राणी, वनस्पती, फुले हे वेगवेगळे आहे. त्यामुळे आपल्या सर्व ऋतुंमधील देवराईचे निरनिराळे रुप हे कमालीच्या उत्सुकतेचा भाग आहे. तसेच देवराईमधील खूप साऱ्या बारीक सारीक गोष्टींचा अभ्यास होणे आजदेखील बाकी आहे. त्यासाठी अभ्यासू व मार्गदर्शक यांच्यासह जास्तीत जास्त तरुणांनी पुढे यायला हवे. - डॉ. माणिक फाटक, देवराईच्या अभ्यासिका ......................देवराईतली निसर्गसंपदा देवराईत एरंड्या, राजा, भटक्या, काळी पाकोळी, चंचल पानपंखी, मलबारी अप्सरा, ही दुर्मिळ प्रजातीं सापडतात. तसेच आंब्याचा मोहोर, कुसर, वेलीची पांढरी सुवासिक फुले, आखराची निळी सुंदर फुले, सुकल्यावर लाल होणारी पापडखार, चांद्याची फुले, अशी विविध फुले लक्ष वेधून घेतात. देवरायांमध्ये असलेल्या कुंडे, पाणवठे यांत गप्पी, कोई, सोनेरी मासे असे मत्स्य वैभवाचे विविध प्रकार पाहायला मिळतात.  

 

टॅग्स :Puneपुणेenvironmentवातावरणforest departmentवनविभागforestजंगल