निरवांगी - येथील नीरा नदीच्या पात्रातील पाणी संपले असल्याने किनारी असलेल्या अनेक शेतकऱ्यांना पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. निरवागी येथे निरा नदीचे पात्र आहे. सध्या या पात्रातील पाणी संपले आहे. या पाण्यावर इंदापूर तालुक्यातील निरवांगी, दगडवाडी, रासकरमळा व त्या परिसरातील वाड्या तर माळशिरस तालुक्यातील देखील पळसमंडळ व परिसरातील वाड्यांवरील शेतकºयांची हजारो हेक्टर शेती पिकांना पाणी मिळत असते.2सध्या या पात्रातील पाणी संपले आहे. यामुळे या पाण्यावर अवलंबून असलेल्या पिकांना फटका बसणार आहे. फेब्रुवारी ते साधारण जुलै पर्यंत सहा महिने हे नदीचे पात्र पाण्याअभावी कोरडे राहणार का, असा प्रश्न शेतकºयांना पडलेला आहे. मार्च महिन्यात धरणातून पाणी एक वेळेस कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरण्यास सोडण्याची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी अनेक वर्षांपासुन सुरु आहे. निरा नदीलगतच्या हजारो शेतकºयांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.3फेब्रुवारी ते साधारण जुलैपर्यंत पात्रात पाणी असल्यास नदीच्या किनारी असलेल्या इंदापूर व माळशिरस तालुक्यातील हजारो हेक्टर शेती पिकांना फायदा होणार आहे. नदीच्या पात्रातील पाण्यामुळे किनारी अनेक गावांतील विंधन विहिर व विहिरींना पाणी राहते. या मुळे नागरिकांना पाण्याची टंचाई भासत नाही. तसेच टँकरची मागणी देखील होत नाही. त्यामुळे शासनाचे टँकरचा खर्च लाखो रुपयांनी वाचतो.
नीरा नदीचे पात्र पडले कोरडे, शेतीच्या पाण्याची टंचाई तीव्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 23:58 IST