शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

छेडछाडीवर वचक बसेल, असा दंड हवा : चित्रा वाघ; धामणेत पीडित कुटुंबाची घेतली भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 13:02 IST

छेडछाडीसारख्या पहिल्याच प्रकरणात जबर दंड व शिक्षा झाली तर गुन्हेगाराचे नंतर गुन्हा करण्याचे धैर्यच होणार नाही, त्यामुळेच यासाठीच्या ३५४ कलमामध्ये ही तरतूद करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शाखेच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली.

ठळक मुद्देमहिलांवरील अत्याचाराबाबत पोलिसांमधील संवेदनशीलता वाढवण्याचा गरज : चित्रा वाघ 'महिला, मुलींवरील अत्याचारांच्या बाबतीत समाज, पोलीस व सरकारने कठोर भूमिका घ्यावी'

पुणे : महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणवल्या जाणाऱ्या पुणे शहरात महिलांवरील अत्याचारांच्या प्रकरणांमध्ये वाढ होत आहे ही चिंताजनक बाब आहे. छेडछाडीसारख्या पहिल्याच प्रकरणात जबर दंड व शिक्षा झाली तर गुन्हेगाराचे नंतर गुन्हा करण्याचे धैर्यच होणार नाही, त्यामुळेच यासाठीच्या ३५४ कलमामध्ये ही तरतूद करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शाखेच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली. वाघ यांनी धामणे या गावातील अत्याचाराने मृत्युमुखी पडलेल्या मुलीच्या कुटुंबाची भेट घेतली. स्थानिक वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच पुणे ग्रामीण विभागाचे पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांची भेट घेऊन त्यांच्याकडे गुन्ह्याचा तपास त्वरेने व्हावा, अशी मागणी केली. त्यांच्यासमवेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा रूपाली चाकणकर, उपाध्यक्ष हसीना इनामदार व अन्य महिला कार्यकर्त्या होत्या.त्यानंतर पत्रकारांशी बोलताना वाघ यांनी महिलांवरील अत्याचाराबाबत पोलिसांमधील संवेदनशीलता वाढवण्याचा गरज आहे असे मत व्यक्त केले. अशा प्रकारच्या गुन्ह्यांमधील गुन्हेगाराला नंतर न्यायालयात उपयोगी पडेल, असा पंचनामा व तपास केला जातो, असे त्या म्हणाल्या. कोंढवा येथील एका मुलीला मारहाण करण्याच्या प्रकारात बघ्यांनी मोबाइलमध्ये व्हिडीओ केला पण मध्ये पडून त्या मुलीला वाचवले नाही, यावरून समाजही संवेदनशीलता हरवत चालला असल्याचे दिसते आहे असे त्यांनी सांगितले.महिला, मुलींवरील अत्याचारांच्या बाबतीत समाज, पोलीस व सरकारने कठोर भूमिका घ्यायला हवी. पोलिसांकडे महिला दक्षता समित्या असतात, त्यातील महिलांना फक्त पंचनामा करण्यासाठी न वापरता पोलिसांनी समाजाचे प्रबोधन करण्यासाठीही वापरावे, असे मत वाघ यांनी व्यक्त केले. रेल्वे तसेच काही सार्वजनिक ठिकाणी विनामूल्य वाय-फाय केले जात आहे. त्यामुळे तरुणांकडून तिथे मोबाइलचा वाटेल तसा वापर केला जातो व त्याचा त्रास महिलांना होतो. त्यामुळेच या धोरणाचाही फेरविचार व्हावा. कलमामधील बदल हे धोरण याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विधीमंडळात आवाज उठवतील, असे वाघ यांनी सांगितले. 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसPuneपुणे