कोपर्डी खून प्रकरणातील दोषींना फाशीच मिळावी- चित्रा वाघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 04:15 PM2017-11-21T16:15:11+5:302017-11-21T16:19:24+5:30

कोपर्डी खून व बलात्कार प्रकरणातील दोषींना फाशीचीच शिक्षा व्हावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांनी केली.

Chitra Wagh: The death sentence for the guilty in the murder case of Kopardi | कोपर्डी खून प्रकरणातील दोषींना फाशीच मिळावी- चित्रा वाघ

कोपर्डी खून प्रकरणातील दोषींना फाशीच मिळावी- चित्रा वाघ

googlenewsNext

अहमदनगर : कोपर्डी खून व बलात्कार प्रकरणातील दोषींना फाशीचीच शिक्षा व्हावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांनी केली.
मंगळवारी जिल्हा व सत्र न्यायालयात कोपर्डी घटनेतील दोषींच्या शिक्षेबाबत युक्तीवाद झाला़ यावेळी न्यायालयाच्या परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, न्यायालय दोषींना सजा सुनावणारच आहे. राज्यभरातील जनक्षोभ, घटनेचे गांभीर्य लक्षात घेता या घटनेतील दोषींना मोठी शिक्षा मिळेल असे दिसते. पण या घटनेतील दोषींना फाशी आणि फाशीचीच शिक्षा मिळाली पाहिजे. त्यामुळे कोपर्डीच्या निर्भयाला न्याय मिळाल्याचे समाधान मिळेल.

कोपर्डी बलात्कार प्रकरण- दोषी कोर्टात म्हणाले आम्ही निर्दोष, शिक्षेबाबत उद्या निर्णयाची शक्यता

कोपर्डी खून व अत्याचार प्रकरणातील दोषींच्या शिक्षेवर मंगळवारी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात युक्तीवाद करण्यात आला. दरम्यान या प्रकरणातील जितेंद्र शिंदे व नितीन भैलुमे या दोघांनीही आम्ही निर्दोष असल्याचे न्यायालयात सांगितले. तिन्ही दोषींच्या शिक्षेबाबत उद्या सुनावणी होणार आहे. सरकारी पक्षाच्या वतीने उद्या विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम युक्तिवाद करणार आहेत. त्यानंतर दोषींच्या शिक्षेबाबत न्यायालय निर्णय घेण्याची शक्यता आहे. 

Web Title: Chitra Wagh: The death sentence for the guilty in the murder case of Kopardi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.