शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

अंजीरासाठी संशोधन गरजेचे - शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 02:57 IST

अंजिराच्या नवीन जाती बाजारात आल्या आहेत. परदेशातील अंजीर साठवण क्षमतेत जास्त काळ टिकतो तसाच आपला अंजीर टिकला पाहिजे. हे फळ जास्त काळ कसे टिकेल, यावर प्रक्रिया उद्योग कसे उभारले जातील तसेच बाजारभाव मिळण्यासाठी देशपातळीवर प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन देशाचे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले.

गराडे  - अंजिराच्या नवीन जाती बाजारात आल्या आहेत. परदेशातील अंजीर साठवण क्षमतेत जास्त काळ टिकतो तसाच आपला अंजीर टिकला पाहिजे. हे फळ जास्त काळ कसे टिकेल, यावर प्रक्रिया उद्योग कसे उभारले जातील तसेच बाजारभाव मिळण्यासाठी देशपातळीवर प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन देशाचे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले.काळेवाडी (ता. पुरंदर) येथे अखिल महाराष्ट्र अंजीर उत्पादक संशोधन संघ, पुणे व महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आदींचे संयुक्त विद्यमाने रविवारी अंजीर परिषदेचे उद्घाटन व अंजीररत्न पुरस्काराचे वितरण माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी परिषदेच्या अध्यक्षस्थानी जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे हे होते.यावेळी माजी कृषिमंत्री दादासाहेब जाधवराव, माजी आमदार अशोक टेकवडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, राज्य कृषी शिक्षण परिषदेचे माजी उपाध्यक्ष विजय कोलते, जिल्हा परिषद सदस्य दत्ता झुरंगे, दिलीप यादव, सुदामराव इंगळे, प्रा. दिगंबर दुर्गाडे, सभापती अतुल म्हस्के, संभाजी झेंडे, शिवाजी पोमण, सतीश उरसळ, तहसीलदार सचिन गिरी, प्रकल्प संचालक सुनील बोरकर, उपविभागीय कृषी अधिकारी बालाजी ताठे, तालुका कृषी अधिकारी देवेंद्र ढगे आदी उपस्थित होते.पाणी येत असेल व त्यात काही अडचणी येत असतील तर सर्वांनी एकत्र बसून आपण त्या सोडविल्या पाहिजेत. तसेच विमानतळ होण्यामुळे भविष्यात या परिसरात बºयाच मोठ्या प्रमाणावर सुधारणा होतील. तेव्हा लोकांनी सामंजस्य व विचारपूर्वक निर्णय घेण्याची गरज असल्याचे शरद पवार यांनी या वेळी सांगितले.या वेळी सीताराम देशमुख (परभणी), अरुण देवरे (नासिक), समीर डोंबे (दौंड), समीर काळे, संभाजी पवार व महादेव खेडेकर (पुरंदर), दीपक जगताप (बारामती), महादेव गोगावले व अरुण घुले (हवेली) यांना अंजीर रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यांत आले. तर डॉ. विकास खैरे यांना अंजीर संशोधनातील शास्त्रज्ञ पुरस्कार देण्यात आला. सौरभ कुंजीर व रोहन उरसळ यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.राज्य अंजीर संघाचे अध्यक्ष रवींद्र नवलाखा, उपाध्यक्ष रामचंद्र खेडेकर, सचिन सुरेश सस्ते, खजिनदारप्रदीप पोमण, जलमित्र सागर काळे, दिलीप जाधव, सुशिल जाधव आदींसह परिषदेच्या संचालकमंडळाने कार्यक्रमाचे आयोजनकेले. प्रास्ताविक सुरेश सस्ते यांनी केले. सूत्रसंचालन संजय पोमण यांनी केले. तर आभार प्रदीप पोमण यांनी मानले.अंजिरातील अडचणी व प्रश्न सोडविण्यासाठी कृषिमंत्री व संबंधित अधिकारी यांच्या बैठकीचे भविष्यात आयोजन केले जाईल. गुंजणीच्या पाइपलाइनचे टेंडर लवकरच निघेल. तालुक्यातील इतर भागाला पुरंदर उपशाचे पाणी मिळविण्यासाठी अधिकाºयांची बैठक घेतली जाईल.- विजय शिवतारे, आमदार

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारPuneपुणे