शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय अत्यावश्यक सेवेची माहिती असणे गरजेचे : डॉ. ज्ञानेश्वर शेळके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 20:31 IST

१०८ क्रमांकाच्या विनामूल्य सेवेबाबत जनजागृती करण्यासाठी देशाचे भविष्य असलेला विद्यार्थी जागरुक पाहिजे : ज्ञानेश्वर शेळके

ठळक मुद्देरोटरी क्लब आँफ पुणे साऊथ आयोजित उपक्रमास प्रारंभराज्यातील प्रशिक्षित ४५०० डॉक्टर दिवस रात्र या सेवेत

पुणे : वैद्यकीय सेवेची माहिती शैक्षणिक संस्थांमधील शिक्षक, विद्यार्थी सर्वांनाच असणे काळाची गरज आहे. आपत्कालीन परिस्थितीत पीडिताला वा रुग्णांना तातडीची गरज मिळावी यासाठी जागृत असे हजारो हात निर्माण झाले पाहिजेत. यासाठी १०८ क्रमांकाच्या विनामूल्य सेवेबाबत जनजागृती करण्यासाठी देशाचे भविष्य असलेला विद्यार्थी जागरुक पाहिजे, असे महाराष्ट्र अत्यावश्यक वैद्यकीय सेवेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर शेळके यांनी प्रतिपादन केले.रोटरी क्लब आँफ पुणे साऊथ यांच्या वतीने महाराष्ट्र वैद्यकीय सेवा आणि बी. व्ही. जी. ग्रुप आँफ इंडिया आयोजित कार्यशाळेचे निमित्त होते. रोटरी पुणे साऊथच्या वतीने पुण्यातील विविध शैक्षणिक संस्थांमधील शिक्षक आणि विद्यार्थ्यांना आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय सेवेची गरज लागल्यास काय करावे, या प्रशिक्षणाचा शुभारंभ सोमवार पेठ येथील दि रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटी येथे रोटरी पुणे साऊथचे माजी जिल्हा प्रशासक प्रमोद जेजुरीकर यांच्या हस्ते  झाला. याप्रसंगी रोटरी पुणे साऊथचे अध्यक्ष मोहन पटवर्धन, अभिजीत जोग, दत्ताजी देवधर, आरपीईएस सोसायटीचे कार्याध्यक्ष संजीव महाजन, शिरीष पटवर्धन उपस्थित होते. अपघात झाल्यास वा अस्वस्थ वाटत असलेल्या रुग्णांना मदतीसाठी  कोण थांबले आहे हे समजले तर त्याला मानसिक बळ मिळते व धक्क्यातून सावरुन निम्मा बरा होतो. त्यामुळे केवळ बघे न बनता मदत केली पाहिजे. यासाठी १०८ नंबर या विनामूल्य सेवेचा उपयोग करून रुग्णाचे प्राण कसे वाचवायचे याचे प्रात्यक्षिक  डॉ. ज्ञानेश्वर शेळके, डॉ. मानसिंग साबळे, डॉ.  मेघना जेऊरे, डॉ. अली शेख, डॉ. आशिषकुमार, व तेजस कराळे यांनी सादर केले. बी. व्ही. जी. ग्रुपच्या सहयोगाने राज्यातील प्रशिक्षित ४५०० डॉक्टर दिवस रात्र ही सेवा पुरवित आहेत. याप्रसंगी संजीव महाजन, शिरीष पटवर्धन, प्रमोद जेजुरीकर, मोहन पटवर्धन आदींनीही मनोगत व्यक्त केले. 

टॅग्स :PuneपुणेHealthआरोग्यStudentविद्यार्थीRotary Clubरोटरी क्लब