शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

बालचित्रवाणीचे पुनरुज्जीवन गरजेचे; बंद पडल्याने झाले मोठे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 14:07 IST

केंद्रीय अर्थसंकल्पात शालेय शिक्षणाकडे लक्ष देण्यात आले

-राहुल शिंदे

पुणे: केंद्रीय अर्थसंकल्पात शालेय विद्यार्थ्यांसाठी नवीन शंभर चॅनल्स सुरू करण्याची घोषणा केली असून या चॅनल्ससाठी आता इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना डिजिटल स्वरुपातील अभ्याससाहित्य तयार करावे लागणार आहे. त्यामुळे राज्य शासनाने बालचित्रवाणीचे पुनरुज्जीवन करणे गरजेचे असून यामुळे उपलब्ध असलेल्या साहित्याचा वापर करणे शक्य होईल, असे मत शिक्षणतज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.

केंद्रीय अर्थसंकल्पात शालेय शिक्षणाकडे लक्ष देण्यात आले असून देशात आता आधुनिक आंगणवाड्या सुरू केल्या जाणार आहेत.तसेच कोरोनामुळे विद्यार्थ्यांना ऑफलाईन शिक्षण घेण्यास मोठ्या अडचणी आल्या. त्यामुळे चॅनलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा विचार पुढे आला. त्यानुसार आता महाराष्ट्रात बारा चॅनल्स सुरू केले जाणार आहेत. त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान, जाणकार व अभ्यासू मनुष्यबळाची आवश्यकता आहे. बालचित्रवाणीकडे सर्वकाही उपलब्ध होते. मात्र,राज्य शासनाच्या दूर्लक्षामुळे बालचित्रवाणीला टाळे लावण्याची वेळ आली. परंतु, कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित झाले. त्यामुळे बालचित्रवाणीचे पुनरुज्जीवन करण्याची गरज निर्माण झाली आहे.

नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी अर्थसंकल्पात ठोस तरतुद केलेली नाही. मात्र,शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी चॅनल्स सुरू केले जाणार आहेत. ही स्वागतार्ह बाब आहे. बालचित्रवाणी बंद झाली नसती तर महाराष्ट्राला चॅनलवर दाखविण्यासाठी आवश्यक असणारे व्हिडिओ तयार करणे सहज शक्य झाले असते. आता सर्वकाही नव्याने सुरू करावे लागणार आहे. मात्र, या चॅनेल्सवर दर्जेदार व्हिडिओ दाखवावे लागतील. त्याशिवाय विद्यार्थी हे चॅनल्स पाहणार नाही.- डॉ.वसंत काळपांडे, ज्येष्ठ शिक्षणतज्ञ

केंद्र शासनाकडून मिळणा-या निधीवर बालचित्रवाणी ही संस्था सुरू होती. केंद्राकडून मिळणारा निधी बंद झाल्यानंतर राज्य शासनाच्या दूर्लक्षामुळे बालचित्रवाणी बंद झाली. राज्यात प्रादेशिक भाषेतील 12 चॅनल्स सुरू होणार असल्याने बालचित्रवाणीचे पुनरुज्जीवन होणे गरजेचे आहे. बालचित्रवाणीकडे असणा-या जुन्या साहित्याचा वापर या चॅनल्ससाठी करता येऊ शकतो.- एन.के.जरग, माजी शिक्षण संचालक

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्र