शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

शहीद कर्नल संतोष बाबू यांना एनडीएत आदरांजली; ‘कर्तव्यनिष्ठ आणि शिस्तप्रिय’ कॅडेट म्हणून होती ओळख 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2020 20:41 IST

लडाखमधील गलवान खोरे येथील सीमारेषेवर चीनी सैनिकांसोबत झालेल्या चकमकीदरम्यान कर्नल बी. संतोष बाबू शहीद झाले .

ठळक मुद्देराष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 105 च्या तुकडीचे विद्यार्थी 

पुणे: भारतीय सीमांचे रक्षण करतांना चीनी सैनिकांना हुसकावून लावतांना झालेल्या चकमकीत कर्नल संतोष बाबू शहीद झाले. शहीद कर्नल संतोष बाबू हे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 105 व्या तुकडीचे विद्यार्थी होते. प्रबोधिनीत असतानाही त्यांची ओळख कर्तव्यनिष्ठ आणि शिस्तप्रिय कॅडेट म्हणून ओळख होती. शनिवारी त्यांचे नाव प्रबोधिनितील 'हट ऑ फ रिमेम्बरन्स' या शहीद जवानांच्या स्मारकामध्ये सुवर्ण अक्षरात लिहून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.लडाखमधील गलवान खोरे येथील सीमारेषेवर चीनी सैनिकांसोबत झालेल्या चकमकीदरम्यान शहीद झालेले कर्नल बी. संतोष बाबू यांना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतर्फे आदरांजली वाहण्यात आली.

प्रबोधिनीच्या परंपरेनुसार, प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी असलेले शहीद कर्नल बाबू यांचे नाव सुवर्णाक्षरांनी पवित्र भिंतीवर लिहण्यात आले.शहीद कर्नल बाबू हे प्रबोधिनीच्या 105 व्या तुकडीचे विद्यार्थी होते. 2000 साली त्यांनी प्रभोधिनीत प्रेवश घेतला होता.  त्यानंतर 2003 मध्ये प्रभोधींतीतून प्रशिक्षण पूर्ण केले. यानंतर  त्यांनी 2004 मध्ये डेहराडून येथील राष्ट्रीय रक्षा अकादमीत प्रेवश घेतला. येथील प्रशिक्षण पूर्ण करून त्यांनी त्यांच्या लष्करी सेवेला प्रारंभ केला होता. दरम्यान  2010 ते 2011 दरम्यान प्रबोधिनीत प्रशिक्षण म्हणूनही ते सेवारत होते. 15 जूनरोजी चीनी सैन्यासोबत झालेल्या वादामध्ये ते गंभीर जखमी झाल्याने शाहिद झाले. लष्करी सेवेत त्यांनी दिलेल्या योगदनासाठी प्रबोधिनीचे प्रमुख लेफ्टनंट जनरल असित मिस्त्री यांनी त्यांना आदरांजली वाहिली.

प्रबोधिनीच्या परंपरेनुसार, लष्करी कर्तव्य बजावताना वीरमरण प्राप्त झालेल्या शहीद जवानांचे नाव हट आॅफ रिमेम्बरन्स या शहीद जवानांच्या स्मारकामध्ये असलेल्या पवित्र भितींवर सुवर्णक्षरांनी लिहिले जाते. याच भिंतीवर शहीद कर्नल बाबू यांच्या नावाचाही समावेश करण्यात आला आहे.कर्नल बाबू हे त्यांच्या शौयार्साठी, कर्तव्य निष्ठेसाठी कायम स्मरणात राहतील. त्यांचे कार्य प्रबोधिनीतील विद्यार्थ्यांना नेहमी प्रोत्साहन देईल, अशी भावना प्रबोधिनीचे प्रमुख लेफ्टनंट जनरल असित मिस्त्री यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Puneपुणेnda puneएनडीए पुणेchinaचीनIndian Armyभारतीय जवानDeathमृत्यू