शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘एनडीए’ची पहिलीच महिला सिल्व्हर मेडलिस्ट..! श्रीती दक्षने ‘लोकमत’ला सांगितला प्रेरणादायी प्रवास

By किरण शिंदे | Updated: May 30, 2025 12:18 IST

एनडीएच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेला सिल्व्हर मेडल मिळाले आहे.

पुणे -  राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या (एनडीए) इतिहासात यंदा पहिल्यांदाच महिला कॅडेटस् ची तुकडी एनडीएमधून प्रशिक्षण पूर्ण करून बाहेर पडली. या तुकडीत १७ महिला आणि ३०० हून अधिक पुरुष कॅडेट्स आहेत. यामध्ये कला शाखेत श्रिती दक्ष हिला सिल्व्हर मेडल प्रदान करण्यात आले. एनडीएच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेला सिल्व्हर मेडल मिळाले आहे.

 

यावेळी लोकमतशी बोलतांना श्रितीने आपल्या प्रवासाबाबत सांगितले. 'मी मूळची हरयाणाची आहे. माझे शालेय शिक्षण नोएडामध्ये झाले. माझे वडील निवृत्त विंग कमांडर आहेत तर आई शिक्षिका आहे. माझी मोठी बहीण एअर फोर्समध्ये आहे. हा प्रवास सुरुवातील कठीण होता पण माझ्या कुटूंबाच्या पाठींब्यामुळे मला हिंमत मिळाली. माझ्या शिक्षकांनी सुद्धा मला योग्य सल्ला आणि मार्गदर्शन दिले. माझ्या प्रक्षिणकाळात मला नेहमीच त्यांनी सपोर्ट केला. त्यांची मी ऋणी आहे.’

एनडीएच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेला सिल्व्हर मेडल मिळालं आहे. त्यामुळेच श्रितीचे हे यश एनडीएमध्ये जाऊ इच्छिणाऱ्या  मुलींसाठी प्रेरणादायी ठरले आहे. दरम्यान, देशसेवेचा वारसा मनात ठेवून कठोर मेहनत, वेळेचे व्यवस्थापन आणि स्वतःवर विश्वास या जोरावर तिने एनडीए परीक्षेची तयारी केली. पुरुषांप्रमाणेच शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक चाचण्या पार करत तिने एनडीएमध्ये प्रवेश मिळवला. कठोर परीश्रमाच्या जोरावर ध्येय गाठल्याने तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडnda puneएनडीए पुणेEducationशिक्षण