शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे कार्यालय पेटवून देण्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2020 06:58 IST

Rupali Chakankar : याबाबत रूपाली चाकणकर यांचे स्वीय सहाय्यक राजदीप राजेंद्र कठाळे यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

धायरी: राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांचे कार्यालय पेटवून देण्याचा धमकीचा फोन आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे याबाबत जयंत रामचंद्र पाटील (रा. तांबवे तालुका वाळवा जिल्हा सांगली) याच्याविरोधात सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यातील धायरी भागात राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे जनसंपर्क कार्यालय आहे. शुक्रवारी सायंकाळी सव्वा पाच वाजता त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात एका इसमाचा फोन आला असता चाकणकर यांचे स्वीय सहाय्यक राजदीप कठाळे यांनी तो उचलला. त्यावेळी फोनवरून मी जयंत रामचंद्र पाटील बोलत असून मला रूपाली चाकणकर यांचा मोबाईल नंबर दे, ती काय करते ते बघतोच तसेच तुला माहिती नाही का मी कोण आहे ते, तुला तुमचे कार्यकर्ते किंवा पोलिस बोलवायचे असतील तर बोलव, मी घाबरत नाही असे म्हणत तुमचे कार्यालय पेटवून देईन अशी धमकी इसमाने फोनवरून दिली.

याबाबत चाकणकर यांचे स्वीय सहाय्यक राजदीप राजेंद्र कठाळे (वय:२५, रा. विठाई सोसायटी, धायरी) यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 

ज्या कुणी अनोळखी व्यक्तीने फोन करून अशा पद्धतीने भाषा वापरून धमकीचा फोन केला आहे. त्याच्याविरोधात सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस योग्य तो तपास करतील, न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे. - रूपाली चाकणकरराष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षा 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणेPoliticsराजकारण