तालुक्यात राष्ट्रवादीचा वरचष्मा
By Admin | Updated: August 14, 2015 03:15 IST2015-08-14T03:15:19+5:302015-08-14T03:15:19+5:30
‘‘तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीसमर्थकांचा वरचष्मा राहिला. जवळपास ३५ ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या अधिपत्याखाली आल्या आहेत

तालुक्यात राष्ट्रवादीचा वरचष्मा
दौंड : ‘‘तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीसमर्थकांचा वरचष्मा राहिला. जवळपास ३५ ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या अधिपत्याखाली आल्या आहेत. सरपंच-उपसरपंच निवडीनंतर जवळपास ४० ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचे वर्चस्व राहील,’’ असा विश्वास माजी आमदार तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी व्यक्त केला.
खुटबाव (ता. दौंड) येथील माजी उपसरपंच शरद शेलार यांची दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याचे त्यांना दौंड येथे निवडीचे पत्र देण्यात आले. या वेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
थोरात म्हणाले, ‘‘सध्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मरगळ झटकून कामाला सुरुवात केली आहे. यामुळे भविष्यातही राष्ट्रवादीचेच वर्चस्व राहील. ज्या कार्यकर्त्यांना नव्याने राष्ट्रवादीने पदे दिली, अशा कार्यकर्त्यांनी पदाचा गैरवापर न करता पक्ष वाढविण्यासाठी मदत करावी.
दौंड तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष अप्पासाहेब पवार यांनी प्रास्ताविक केले. भाऊसाहेब ढमढेरे यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माऊली चव्हाण, सुभाष नागवे, उत्तम आटोळे, तात्यासाहेब टुले, जी. के. थोरात आणि मान्यवर उपस्थित होते.