शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीचे निलंबित नेते मंगलदास बांदल यांचा वैद्यकीय कारणास्तव केलेला जामीन अर्ज फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2020 17:04 IST

लक्ष्मी रस्त्यावरील नामांकित सराफाला 50 कोटीची खंडणी मागितल्या प्रकरणी बांदल अटकेत..

ठळक मुद्देपोलीस कोठडीत असताना तब्येत बिघडल्याने त्यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल

पुणे : व्हिडीओ व्हायरल करण्याची, तसेच जीवे ठार मारण्याची धमकी देत लक्ष्मी रस्त्यावरील नामांकित सराफाला 50 कोटीची खंडणी मागितल्या प्रकरणी राष्ट्रवादीचे निलंबित नेते मंगलदास बांदल यांनी वैद्यकीय कारणास्तव केलेला जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. यापूर्वी त्यांचा एकदा जामीन न्यायालयाने फेटाळला आहे.याप्रकरणी प्रसिद्ध सराफी व्यावसायिकाने दत्तवाडी पोलीस ठाण्यात दिली आहे. बांदलसह आशिष हरिश्चंद्र पवार (वय-27), रूपशे ज्ञानोबा चौधरी (वय-45), रमेश रामचंद्र पवार (वय-32), संदेश वाडेकर यांनी अटक करण्यात आली होेती.संदेश वाडकर आणि रुपेश चौधरी या दोघांचा या गुन्हयात जामीन फेटाळण्यात आला आहे. फिर्यादीच्या वतीने अ‍ॅड.पुष्कर दुर्गे काम पाहत आहेत.बांदल यांनी फिर्यादी सराफाला फोन करुन भेटण्यासाठी बोलावले होते. त्या वेळी रुपेश चौधरी सोबत होता. बांदल यांनी सराफाला तुमच्या जवळचे लोकच तुम्हाला त्रासदायक ठरणार आहेत. म्हणून येथून पुढे काही असेल, तर रुपेश चौधरीच माझ्या वतीने काम पाहील, अशी ओळख त्या सराफ व्यावसायिकाला करुन दिली होती. त्यानंतर सराफाला भेटलेला आशिष पवार हा रुपेश चौधरीच्या नावाने सराफाकडे खंडणीची मागणी करत होता. या प्रकरणी पोलिसांनी बांदल यांना अटक केली आहे. पोलीस कोठडीत असताना तब्येत बिघडल्याने त्यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथून डिस्चार्ज मिळाल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. त्यानंतर बचाव पक्षाने वैद्यकीय कारणास्तव जामीन मिळावा, असा अर्ज न्यायालयात केला. या अर्जास सहाय्यक सरकारी वकील गौरी कदम यांनी विरोध केला. या प्रकरणात या पूर्वी दोघांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. बांदल हे या प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत. त्यांना जामीन देणे योग्य नसून, येरवडा कारागृहात वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे त्यांचा जामीन फेटाळवा, अशी मागणी ?ड. कदम यांनी केली फियार्दीच्या वतीने ?ड.पुष्कर दुर्गे यांनी काम पाहत आहेत.

टॅग्स :PuneपुणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliceपोलिसArrestअटकCourtन्यायालय