शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीचे ‘एक रुपया पुणे मनपासाठी’ आंदोलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 19:20 IST

वारक-यांच्या निवा-याची सोय आणि आरोग्याच्या सुविधा पुरविणे हे पालिकेचे कर्तव्य होते. पालिकेच्या उदासिनतेमुळे वारक-यांचे प्रचंड हाल झाले.

ठळक मुद्देअजित पवार आणि वारक-यांनी देखील दानपेटीत एक रुपया टाकून आपला निषेध ही गंगाजळी पुणे महानगरपालिकेकडे सुपूर्द केली जाणार

पुणे : वारक-यांसाठी नानापेठ आणि भवानी पेठेत करण्यात येणा-या पत्र्याच्या शेडबाबत महानगरपालिकेने दाखविलेल्या उदासिनतेचा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ‘एक रुपया पुणे मनपासाठी’ अनोखे आंदोलन करून निषेध करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार आणि वारक-यांनी देखील महानगरपालिकेच्या गंगाजळीसाठी दानपेटीत एक रुपया टाकून आपला निषेध नोंदवला. राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन नगरसेवक रवींद्र माळवदकर यांनी १९९२ मध्ये वार्डस्तरीय निधीतून वारक-यांच्या निवा-यासाठी मंडप टाकला होता. पुणे मनपाने दरवर्षीप्रमाणे यंदाही वारक-यांच्या निवा-याची सोय करावी या संदर्भात १७ मे २०१८ रोजी निवेदन दिले होते. परंतु, मिरा-भाईंदर मनपा संदर्भात न्यायालयाने दिलेल्या निकालाचा संदर्भ देत महापालिकेने पुरेसा निवारा उभारण्यासंदर्भात असमर्थता दर्शवली. वारक-यांच्या निवा-याची सोय आणि आरोग्याच्या सुविधा पुरविणे हे पालिकेचे कर्तव्य होते. पालिकेच्या उदासिनतेमुळे वारक-यांचे प्रचंड हाल झाले. महानगरपालिकेच्या या कृत्याचा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निषेध करण्यात आला. ‘एक रुपया पुणे मनपासाठी’ हे आंदोलन करण्यात आले. त्यात प्रत्येक वारक-याने मदत पेटीत एक रुपया टाकून गळती लागलेल्या पुणे मनपाच्या सभागृहाच्या दुरुस्तीचे काम करुन घेण्यासाठी तसेच वारक-यांसाठी पत्र्याच्या शेड बांधण्यासाठी गंगाजळी निर्माण केली आहे. ही गंगाजळी पुणे महानगरपालिकेकडे सुपूर्द केली जाणार आहे. 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसPandharpur Wariपंढरपूर वारी