शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीची पुणेकरांसाठी 'लयभारी' स्पर्धा; 'या'चा सेल्फी किंवा व्हिडिओ पाठवा अन् ११ हजार १११ रुपये मिळवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2021 15:11 IST

पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकांच्या निवडणुका अगदी काही महिन्यांवरून येऊन ठेपल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ताधारी भाजपला आव्हान दिले आहे. 

पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकांच्या निवडणुका अगदी काही महिन्यांवरून येऊन ठेपल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात विकास कामांवरून होणाऱ्या आरोप - प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. तसेच शहरात काही दिवसांपूर्वी भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेत जोरदार 'होर्डिंग वॉर' देखील पाहायला मिळाले होते. मात्र, आता महापालिकेतील विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने ''विकासाची पोलखोल स्पर्धा" आयोजित करत सत्ताधारी भाजपसमोर आव्हान दिले आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसकडून 'विकासाची पोलखोल' या स्पर्धा जाहीर केली आहे. शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी या स्पर्धेची घोषणा केली आहे. यामध्ये पुण्यातील नागरिकांनी व्हिडिओ आणि सेल्फी फोटो पोस्ट करणार्‍या विजेत्या स्पर्धकास बक्षीसं देखील दिली जाणार आहेत. आपल्या भागातील समस्येचा फोटो किंवा व्हिडिओ संबधित व्यक्तीने #polkholpune या हॅशटॅगवर पोस्ट करायचा आहे. या स्पर्धेत विजेत्यांना प्रत्येकी ११,१११ रुपये असे बक्षीस दिले जाणार आहे. 

पुणे शहरातील विविध खड्डे, कचरा, यांसारख्या ज्वलंत प्रश्नांसह विकास कामांच्या पूर्ततेसाठी अनेकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आंदोलने करण्यात येत असतात. मात्र, तरीदेखील अनेक समस्यांबाबत जैसे थे अशी परिस्थिती पाहायला मिळते. महापालिकेतील सत्ताधारी पक्ष असणाऱ्या भाजपवर विकासकामांवरून टीकास्र सोडतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसने 'विकासाची पोलखोल' स्पर्धाच जाहीर केली आहे.

पुण्यात रंगलं होतं 'होर्डिंग वॉर' 

पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राजकीय पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. पुण्यात फडणवीस आणि पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भाजप आणि राष्ट्रवादीकडून जोरदार 'पोस्टरबाजी' द्वारे शक्तिप्रदर्शन केल्याचे पाहायला मिळाले होते. 

 

टॅग्स :PuneपुणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाBJPभाजपाPoliticsराजकारण