शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

समाविष्ट गावांचा महापालिकेत आक्रोश : राष्ट्रवादीचे आंदोलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 21:19 IST

समाविष्ट ११ गावांमधील विकासकामांकडे दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महापालिकेत आक्रोश आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देसमाविष्ट ११ गावांमधील विकासकामांकडे दुर्लक्ष करत असल्या निषेधमहापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळच्या पायऱ्यांवरच आंदोलक बैठक

पुणे: समाविष्ट ११ गावांमधील विकासकामांकडे दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महापालिकेत आक्रोश आंदोलन करण्यात आले. या गावांचा महापालिकेत समावेश होऊन वर्ष झाले. तरीही गावांमध्ये नागरी सुविधा दिल्या जात नाहीत, विकास कामे केली जात नाहीत अशी टीका यावेळी करण्यात आली.महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळच्या पायऱ्यांवरच आंदोलक बैठक मारून बसले होते. राष्ट्रवादीचे महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांच्या नेतृत्वाखाली माजी आमदार बापूसाहेब पठारे, कमल ढोले पाटील, माजी महापौर दत्ता धनकवडे, तसेच सचिन दोडके, रविंद्र माळवदकर, सुनिल टिंगरे, महिला आघाडी शहराध्यक्ष रुपाली चाकणकर व गावांमधील शंकर खांदवे, दिनकर हरफळे, रोहित राऊत, अतूल दांगट,निवृत्ती बांदल, वसंत कड, सागर हरफळे, भाऊसाहेब डफळ, रुपेश तुपे, संदीप पवार, दीपक बेलदरे, असीफ बागवान, गणेश खांदवे आदी आंदोलनात सहभागी झाले होते. राज्य सरकार तसेच महापालिका प्रशासन, पदाधिकारी यांच्या विरोधात यावेळी घोषणा देण्यात आल्या. तुपे म्हणाले, आमच्या सरकारच्या काळात हद्दवाढीनंतर संबधित महापालिकांना अनुदान देण्यात येत होते. ही ११ गावे महापालिकेत आणण्याची सरकारची इच्छा नव्हती. न्यायालयाच्या दबावामुळे त्यांना निर्णय घ्यावा लागला. आता वर्ष झाले तरीही या गावांमधील विकासकामांकडे ना सरकार लक्ष देत आहे ना महापालिका. तिथे चांगले आरोग्य नाही, शिक्षण नाही, रस्ते नाही, पाणी नाही. साधी सार्वजनिक स्वच्छताही तिथे होत नाही. ग्रामपंचायतीचे कर्मचारी वर्ग करून घेतले त्यांचे वेतन नियमित केले जात नाही. महापालिकेने करवसुली सुरू केली, दप्तर ताब्यात घेतले, मात्र, काम करायला तयार नाही. १०० कोटी रूपये अंदाजपत्रकात ठेवले सांगत आहेत.पण त्यातून काय कामे करायची, त्याच्या निविदा तरी निघाल्या का हेही सांगितले जात नाही. महापालिका प्रशासन व पदाधिकाऱ्यांनी या गावांना वाऱ्यावर सोडले आहे.त्याचाच निषेध म्हणून आक्रोश आंदोलन आहे.  तुपे तसेच अन्य पदाधिकाऱ्यांनी आंदोलनानंतर महापौर मुक्ता टिळक यांना निवेदन दिले. गावांमधील विकासकामे त्वरीत सुरू करावीत, स्थानिक पदाधिकाºयांना विश्वासात घ्यावे, कामांचा प्राधान्यक्रम नागरिकांना विचारून ठरवावा, राज्य सरकारकडून गावांमधील विकासकामांसाठी निधी मिळवावा अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा