शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीचे युवा नेते रविराज तावरे यांना पुढील उपचारासाठी पुण्याला हलविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 17:34 IST

रविराज तावरे (वय ४०) यांच्यावर सोमवारी सायंकाळी गोळीबार केला.

ठळक मुद्देप्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांचे स्पष्टीकरण

बारामती: जिल्हा परिषद सदस्या रोहिणी रविराज तावरे यांचे पती  राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रविराज सदाशिवराव तावरे यांना बुधवारी (दि २) पुढील उपचारासाठी पुण्याला हलविण्यात आले आहे.तावरे यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे,त्यांची प्रकृती देखील स्थिर आहे. केवळ पुढील उपचारासाठी तावरे यांना पुण्याला हलविण्यात आल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉ. रमेश भोईटे यांनी सांगितले.

तावरे (वय ४०) यांच्यावर सोमवारी (दि. ३१) सायंकाळी गोळीबार केला. या घटनेनंतर तावरे यांना बारामती शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.त्यानंतर तावरे यांच्यावर येथील गिरीराज रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.गिरीराज रुग्णालयाचे प्रमुख डॉ. रमेश भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्याचे हृदयशस्त्रक्रिया तज्ञ डॉ. रमेश चव्हाण, अतिदक्षता विभाग प्रमुख डॉ. निती महाडिक, भुलतज्ञ डॉ संतोष घालमे, डॉ.अमर पवार, डॉ.संजय पुरंधरे,हृदयरोगतज्ञ डॉ.सनी शिंदे,डॉ.सुनील पवार, डॉभास्कर जेधे, डॉ अजिंक्य निंबाळकर आदी डॉक्टरांच्या पथकाने मंगळवारी(दि १) मध्यरात्री दीड ते दोन च्या सुमारास शस्त्रक्रिया करत तावरे यांच्या शरीरात घुसलेली गोेळी बाहेर काढली. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. या शस्त्रक्रियेनंतर तावरे यांच्यावर गिरीराजच्या अतिदक्षता विभागात सुरु होते.याबाबत डॉ. भोईटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, तावरे यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे.त्यांच्या प्रकृतीला कोणताही धोका नाहि,त्यांची प्रकृती स्थिर आहे.नातेवाईकांच्या इच्छेनुसार पुढील उपचारासाठी त्यांना पुण्यात हलविण्यात आले आहे.—————————————...तीन आरोपींना ७ जूनपर्यंत पोलीस कोठडीदरम्यान, रविराज तावरे गोळीबार प्रकरणी बारामती ग्रामीण पोलीसांनी  एका अल्पवयीन मुलासह राहुल उर्फ रिबेल यादव, प्रशांत मोरे, विनोद उर्फ टॉम मोरे यांना केली अटक केली आहे. त्यापैकी तीन आरोपींना ७ जुन पर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे,तर अल्पवयीन आरोपीला बाल सुधारगृहात पाठविण्यात आले आहे,अशी माहिती तपास अधिकारी बारामती तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांनी दिली.———————————————

टॅग्स :BaramatiबारामतीFiringगोळीबारhospitalहॉस्पिटलPuneपुणेNCPराष्ट्रवादी काँग्रेस