शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीत पवार कुटुंबातील संघर्षाचा दुसरा अंक?; युगेंद्र पवारांच्या उमेदवारीसाठी थेट शरद पवारांकडे मोर्चेबांधणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2024 12:40 IST

अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार हे त्यांना विधानसभा निवडणुकीत आव्हान देण्याची शक्यता आहे.

Yugendra Pawar ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात पवार कुटुंबात झालेल्या संघर्षाची राज्यभर चर्चा झाली. या निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुतण्या अजित पवार यांना शह देत बारामतीचे खरे 'दादा' आपणच असल्याचं दाखवून दिलं. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीतही पवार विरुद्ध पवार संघर्ष रंगण्याची शक्यता असून आता अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार हे त्यांना विधानसभा निवडणुकीत आव्हान देण्याची शक्यता आहे. युगेंद्र पवार यांना विधानसभेची उमेदवारी द्यावी, अशी मागणी आज त्यांच्या समर्थकांनी शरद पवार यांच्याकडे केली आहे.

लोकसभा निवडणुकीपासून युगेंद्र पवार हे बारामतीच्या राजकारणात सक्रिय झाले आहेत. महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्यासाठी युगेंद्र यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला होता. या निवडणुकीत बारामती तालुक्यातूनही सुप्रिया सुळे यांना ४८ हजारांहून अधिक मताधिक्य मिळाल्याने विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवारांच्या पक्षात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळेच आता अजित पवारांविरोधात युगेंद्र पवार यांना उमेदवारी देण्याची मागणी कार्यकर्त्यांमधून होऊ लागली आहे. या मागणीला शरद पवार हे आगामी काळात कसा प्रतिसाद देतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

शरद पवारांनी काय म्हटलं आहे? 

शरद पवार हे विधानसभा निवडणुकीत अजित पवारांविरोधात कुटुंबातील एखादा तरुण चेहरा पुढे करतील, असं बोललं जात आहे. याबाबत काही दिवसांपूर्वी विचारण्यात आलेल्या थेट प्रश्नाला शरद पवार यांनी चाणाक्षपणे उत्तर देत लगेच आपले पत्ते उघड करणं टाळलं होतं. शरद पवार यांना एका यूट्यूब चॅनलवरील मुलाखतीदरम्यान बारामती विधानसभेच्या संभाव्य उमेदवाराबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना पवार यांनी म्हटलं होतं की, "उमेदवार कोण असेल, हे आज सांगता येणार नाही. विधानसभा निवडणुकीला आणखी वेळ आहे. लोकसभा निवडणुकीचं चित्र कसं होतंय, उद्या देशात कोणाची सत्ता येतेय, महाराष्ट्रात भाजपची काय स्थिती राहतेय, या गोष्टी पाहाव्या लागतील. भविष्यात भाजपची सत्ता महाराष्ट्रात येऊ नये, असा आमचा प्रयत्न राहणार आहे. या गोष्टीला महाराष्ट्रातील ठिकठिकाणी जे सोईचे उमेदवार असतील, ते देण्याचा आमचा प्रयत्न राहील. निदान मी तरी त्याबाबत अद्याप विचार केलेला नाही," असं म्हणत तेव्हा पवार यांनी याबाबत स्पष्टपणे बोलणं टाळलं होतं.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारbaramati-pcबारामतीmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४NCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारbaramati-acबारामती