महापालिकेवर पुन्हा राष्ट्रवादीचीच सत्ता येईल
By Admin | Updated: May 22, 2016 01:01 IST2016-05-22T01:01:38+5:302016-05-22T01:01:38+5:30
आगामी महापालिका निवडणुकीसाठी पक्ष संघटना अधिक मजबूत करून महापालिकेत पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आणण्याचा विश्वास पक्षाच्या शहराध्यक्ष

महापालिकेवर पुन्हा राष्ट्रवादीचीच सत्ता येईल
पुणे : आगामी महापालिका निवडणुकीसाठी पक्ष संघटना अधिक मजबूत करून महापालिकेत पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आणण्याचा विश्वास पक्षाच्या शहराध्यक्ष खासदार अॅड. वंदना चव्हाण यांनी शुक्रवारी (दि.२०) व्यक्त केला शहराध्यक्षपदी अॅड. चव्हाण यांची फेरनियुक्ती झाल्याबद्दल पक्षाच्या वतीने महापौर प्रशांत जगताप यांच्या हस्ते पक्ष कार्यालयात पुष्पगुच्छ देऊन सत्कार त्यांचा करण्यात आला. या वेळी त्या बोलत होत्या.
स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके, माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, मोहनसिंग राजपाल, शिक्षण मंडळ अध्यक्ष वासंती काकडे, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अशोक राठी, नगरसेविका नंदा लोणकर, लक्ष्मीताई दुधाणे, माजी स्थायी समिती अध्यक्षा अश्विनी कदम, मोहिनी देवकर, नगरसेवक विशाल तांबे, शिवालाल भोसले, अप्पा रेणूसे, प्रदीप गायकवाड, महिला शहराध्यक्ष रूपाली चाकणकर, इक्बाल शेख, मनाली भिलारे, राकेश कामठे, नितीन ऊर्फ बबलू जाधव, शालिनी जगताप, आनंद रिठे या वेळी उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना चव्हाण म्हणाल्या, की पक्षाने केलेल्या चांगल्या कामामुळे २०१७ च्या निवडणुकीत पुणेकर नक्कीच यश देतील. परंतु याकरीता पक्ष संघटन जास्त महत्त्वाचे आहे. एकत्रितपणे काम केल्यास यश नक्कीच मिळणार आहे. २४ तास पक्ष कसा वाढेल, शहर चांगले कसे ठेवता येईल, त्यासाठी आपण काय केले पाहिजे, याचाच विचार मी करते आणि तो पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी करावा, असे आवाहन त्यांनी या वेळी कार्यकर्त्यांना केले. (प्रतिनिधी)