शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीकरांसमोर शरद पवारांनी केलं लेकीचं कौतुक; सुप्रिया सुळेंबद्दल म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2024 22:16 IST

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना पायाला भिंगरी बांधली असून ते मतदारसंघ पिंजून काढत आहेत.

NCP Sharad Pawar ( Marathi News ) : बारामती लोकसभा मतदारसंघात मागील तीन टर्मपासून खासदार असलेल्या सुप्रिया सुळे यांच्यासाठी यंदाची निवडणूक अत्यंत आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे. कारण त्यांच्याविरोधात या निवडणुकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या मैदानात उतरण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांचा विजय सुकर व्हावा, यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना पायाला भिंगरी बांधली असून ते मतदारसंघ पिंजून काढत आहेत. आज पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत स्वाभिमानी व्यापारी महासंघाचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना शरद पवारांनी आपल्या खासदार असलेल्या कन्येचं कौतुक करत मतदारांना साथ देण्याचं आवाहन केलं आहे.

मेळाव्यात बोलताना शरद पवार म्हणाले की, "लोकांचं दुखणं मांडणारे जे खासदार आहेत त्यामध्ये तुमच्या खासदाराचे नाव हे फार वर आहे, त्यामुळे अशा व्यक्तीला तुम्ही लोकांनी यापूर्वी निवडून दिलं, ती संधी या ही वेळेला द्याल अशा प्रकारची अपेक्षा करतो," अशा शब्दांत शरद पवार यांनी लेकीवर स्तुतीसुमने उधळली. तसंच "खूण बदलली, कोर्टामध्ये काही गोष्टी गेल्या आणि सुप्रीम कोर्टाने व निवडणूक आयोगाने तुतारी वाजवणारा माणूस ही नवीन खूण दिलेली आहे, ती तुमच्या लक्षात ठेवावी लागेल, तिच्या पुढील बटण दाबलं पाहिजे आणि तुम्हा लोकांच्या मनात जे आहे ते त्यानिमित्ताने आपल्या बटण दाबण्यातून तुम्ही व्यक्त करावं," असं आवाहनही पवारांनी केलं आहे.

बारामतीतील व्यापाऱ्यांना कोणत्या शब्द दिला? 

व्यापारी महासंघाच्या मेळाव्यात बोलताना शरद पवार यांनी नव्याने तयार करण्यात आलेल्या संघटनेला बळ देण्याचं आश्वासन दिलं आहे. "कुठलाही देश, कुठलेही राज्य, कुठलाही तालुका हा पुढे न्यायचा असेल तर व्यापार वाढला पाहिजे, व्यवहार वाढला पाहिजे. त्यामध्ये दोन भाग आहेत एक मोठा व्यापार करणारे लोक, दुसरे छोटे लोक. आजपर्यंत बारामतीमध्ये व्यापारी संघटना अनेक वर्षे काम करत आहेत. पण त्यामध्ये छोट्या लोकांचा विचार हा कमी होता, ही भूमिका आम्हा लोकांच्या आता लक्षात आली. श्रीयुत सस्ते व श्रीयुत पाटणकर या लोकांनी पुढाकार घेऊन नवी संघटना बांधली. याच्यात लाखात व्यवहार करणारा कोणीही नसे, हजारात व्यवहार करणारे असे. हे छोटे व्यापारी शेवटी आपले कुटुंब चालवतात, गावाची अर्थव्यवस्था मजबूत करण्याला हातभार लावतात. म्हणून या छोट्या व्यापाऱ्यांची एक संघटना असावी या दृष्टीने स्वाभिमानी व्यापारी महासंघ ही संस्था आज या ठिकाणी उभी राहिली. संस्था स्थापन करण्यामध्ये ज्यांनी पुढाकार घेतला त्यांना एकच गोष्ट सांगायची आहे की हे लहान व्यावसायिक आहेत. त्यांच्या अडचणीत अधिक लक्ष घाला, जिथे त्यांच्या अडचणीसंबंधी सोडवायला तुम्हाला काही मर्यादा आल्या तर आम्हा लोकांना कॉन्टॅक्ट करा. आमची शक्ती व पाठिंबा हा छोट्यांच्या पाठीमागे राहील. मला बारामती व सबंध महाराष्ट्राचा छोटा-मोठा उद्योग, व्यापार, हा वाढवायचा आहे. हा वाढवणं याचा अर्थ आर्थिक दृष्ट्या राज्य समृद्धीच्या दिशेने जाणं. ते काम करायचं असेल तर आपल्याला प्रयत्न करावे लागतील. हे संघटन तुम्ही उभं केलं; आता निवडणुकीची प्रक्रिया आहे ती संपल्यानंतर पुन्हा एकदा आपण बसू," असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसSupriya Suleसुप्रिया सुळेbaramati-pcबारामतीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४