विकासकामांमुळे खराडीत राष्ट्रवादीच

By Admin | Updated: February 15, 2017 02:24 IST2017-02-15T02:24:47+5:302017-02-15T02:24:47+5:30

खराडी-चंदननगर प्रभागात गेल्या पाच वर्षांत विकासकामे केल्यामुळे विकासाच्या जोरावर खराडी-चंदननगर प्रभाग ४मध्ये पुन्हा घड्याळाचीच

NCP is ready for the development work | विकासकामांमुळे खराडीत राष्ट्रवादीच

विकासकामांमुळे खराडीत राष्ट्रवादीच

पुणे : खराडी-चंदननगर प्रभागात गेल्या पाच वर्षांत विकासकामे केल्यामुळे विकासाच्या जोरावर खराडी-चंदननगर प्रभाग ४मध्ये पुन्हा घड्याळाचीच टिक-टिक वाजणार असल्याचे उमेदवार महेंद्र पठारे यांनी सांगितले.
राष्ट्रवादीच्या माध्यमातून खराडी गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, ज्येष्ठ नागरिकांसाठी दिनकर पठारेवस्तीत दोन हजार स्क्वेअर फुटाचे विरंगुळा केंद्र उभारले, आपले घर येथे व्यायामशाळा उभारली, तुळजीभवानीनगर येथे महिलांना व्यवसायात संधीसाठी महिला औद्योगिक केंद्र उभारले, स. नं. ५ रक्षकनगर गोल्ड येथे विद्यार्थ्यांसाठी निवासी शाळा व भव्य जलतरण तलाव उभारला, गोरगरिबांची स्वस्तात लग्नकार्ये व इतर कार्य पार पाडण्यासाठी दिनकर पठारेवस्तीत बहुउद्देशीय सभागृह उभारले.
खराडी गावात सर्व खेळाडूंसाठी १० कोटी खर्च करून बंदिस्त स्टेडियम उभारले, मुंढवा-खराडी पुलावरील वाहतूककोंडी फोडण्यासाठी नवीन पुलाचे काम मंजूर करून काम अंतिम टप्प्यात आणले, खराडीतील दोन्ही चौकांत सिग्नल उभारले, महिला बचत गटांसाठी दिवाळीत बचत बाजारांचे आयोजन केले
जाते.
दरवर्षी १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांना मनपाची शिष्यवृत्ती मिळवून दिली, अशा प्रकारची अनेक कामे खराडी-चंदननगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून केली असल्याचे महेंद्र पठारे यांनी सांगितले.
गणेश गवळी, नाना राउत, दहिफळेसाहेब, सुरेश चव्हाण, नारायण चौधरी, मनोहर साबळे, कमलेश लोढा, शरद खेडेकर, श्रीमंत जगदाळे, शेख मुक्तार, सिद्दीकी शेख, आलिम शेख, बाळासाहेब सुक्रे, आदिनाथ गलांडे, सुनील पठारे, कैलास पठारे, अविनाश खांदवे, अजित संकपाळ, स्वप्निल खांदवे, कैलास सुक्रे, विलास सुक्रे, बबन सुक्रे, पिराजी भोसले, गणेश भोर, विशाल सुक्रे हे पदयात्रेत सहभागी झाले होते.
(प्रतिनिधी)

Web Title: NCP is ready for the development work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.