शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

"मतदार एकदा मत देईल पण...", पंतप्रधान मोदींच्या घराणेशाहीच्या टीकेला शरद पवारांचं प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2023 16:57 IST

शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

पुणे : परदेशी दौऱ्यावरून आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांना त्यांच्या एकजुटीवरून लक्ष्य केले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पक्षातील घराणेशाही आणि घोटाळ्यांचे आरोप यावरून मोदींनी पवारांवर टीका केली होती. या टीकेला पवारांनी पत्रकार परिषदेतून उत्तर दिले. "पंतप्रधान यांनी माझ्या पक्षाबद्दल मत व्यक्त केले. पण माझी मुलगी स्वत:च्या कर्तुत्वाने आहे. ती लोकांमधून निवडून आली असून संसदेत तिचे काम उच्च दर्जाचे आहे", अशा शब्दांत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोदींना प्रत्युत्तर दिले. 

पंतप्रधानांनी घराणेशाहीवरून विरोधकांवर टीका केली होती. "सुप्रिया सुळे यांचे भले करायचे असेल तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला मतदान करा", असा उपरोधिक टोला मोदींनी लगावला होता. यावर बोलताना पवारांनी म्हटले, "पंतप्रधानांनी माझ्या पक्षाबद्दल मत व्यक्त केले. माझी मुलगी स्वत:च्या कर्तुत्वाने इथे आहे. ती लोकांमधून निवडून आली आहे आणि संसदेत तिचे काम उच्च दर्जाचे आहे. मतदार एकदा मत देईल पण काम नसेल तर कोणी मत देणार नाही. त्यामुळे असे मत त्यांनी व्यक्त करणे योग्य नाही."

तसेच राज्यात जातीय, धार्मिक वातावरण तयार केले जात आहे. कोल्हापूर, संगमनेर, नांदेड, अकोला इथे दंगली झाल्या. जाती धर्माच्या नावाखाली रस्त्यावर येऊन दहशतीचे वातावरण निर्माण केले गेले. कायदा सुव्यवस्था परिस्थिती काय आहे हे स्पष्ट दिसत असल्याची टीका पवारांनी केली.  राज्यातील २४५८ मुली बेपत्ता"राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न चिंतेचा झाला आहे. पुण्यामधून ९३७ मुली बेपत्ता आहेत, ठाण्यातून ७२१, मुंबईतून ७३८, सोलापूरमधून ६२ मुली अशा एकूण २४५८ मुली बेपत्ता आहेत. १४ जिल्ह्यात एकूण ४४३१ मुली, महिला बेपत्ता आहेत. त्यामुळे राज्याच्या गृहमंत्र्यांनी इतर वक्तव्य करण्यापेक्षा याकडे लक्ष दिले पाहिजे", असा टोलाही पवारांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसSupriya Suleसुप्रिया सुळेBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी