शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

तहसीलदार महिलेच्या पतीकडून जीवाला धोका; राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराची पोलिस ठाण्यात तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2020 12:35 IST

माझ्या जीवाला धोका असून माझे काही बरेवाईट झाल्यास तहसीलदार व त्यांचे पती यांना जबाबदार धरावे..

ठळक मुद्देतक्रारीची चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात येणार

राजगुरूनगर: खेडच्या तहसीलदार सुचित्रा आमले यांचे पती बाळासाहेब आमले यांच्या पासून आपल्या जीवाला धोका असुन गुंड प्रवृत्ती आणि त्या वातावरणात वावरणाऱ्या तहसीलदार यांचे पती बाळासाहेब आमले यांच्यावर पोलिसांनी कारवाई करावी अशा प्रकारची तक्रार मागणी आमदार दिलीप मोहिते पाटील खेड पोलीस ठाण्यात दिली आहे.     सुचित्रा आमले खेडच्या तहसीलदार म्हणून रुजू झाल्यावर तालुक्यातील अनेक गावात अवैध कामे करीत आहेत.जमिनीच्या नोंदी, दाखले,रेशनकार्ड आदींसाठी तलाठी, सर्कल यांच्या माध्यमातून नागरिकांची अडवणूक करून मोठ्या प्रमाणात आर्थिक तडजोडी करीत आहेत.तहसीलदार यांच्या या मनमानी कारभाराबाबत अनेक गावातील सरपंच, प्रतिनिधी व नागरिकांनी तक्रारी केल्यावर लोकप्रतिनिधी या नात्याने आपण चौकशी सुरू केली. मात्र हे केल्यावर तहसीलदार यांचे पती बाळासाहेब आमले यांनी विरोधकांकडे माझ्या जीवाला धोका करण्याची थेट वक्तव्य केली.त्यांच्याशी माझा थेट संपर्क आलेला नाही. मात्र हा माणूस गुंड प्रवृत्तीच्या वातावरणात वावरत असल्याचे सांगितले जाते. म्हणून त्यांच्यापासून माझ्या जीवाला धोका असून माझे काही बरेवाईट झाल्यास तहसीलदार सुचित्रा आमले व त्यांचे पती बाळासाहेब आमले यांना जबाबदार धरावे असेही आमदार मोहिते पाटील यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.तक्रारीची चौकशी करून गुन्हा दाखल केला जाईल असे पोलीस निरीक्षक सतीश गुरव यांनी सांगितले. तक्रारीत तहसीलदार सौ आमले यांच्या पाठींब्याने ही कामे होत आहेत...

 

आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केलेले आरोप १) तालुक्यातील भीमा, भामा आणि इंद्रायणी नदीत अवैध वाळू उपसा२)सरकारी गायरान व सेझ जागेत अवैध उत्खनन ३)कोरोनाच्या लॉक डाऊन काळात चाकण मध्ये तलाठी, सर्कलच्या माध्यमातून बेहिशेबी रक्कम गोळा केली४)तहसीलदार आपत्ती व्यवस्थापन समिती अध्यक्ष, मात्र कोरोना काळात एकही बैठक झाली नाही५)त्यांच्या कामचुकार पणामुळे तालुक्यातील रुग्णवाढ६)गुळाणी येथील शेतकरी आत्महत्या प्रकरण दाबले ७)पतीच्या माध्यमातून तहसीलदार यांनी तालुक्यातुन मोठी माया गोळा केली ८)पती बाळासाहेब आमले गुंडांशी संबंधित असुन माझा घातपात करतील

टॅग्स :KhedखेडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसNCPराष्ट्रवादी काँग्रेसMLAआमदार