शहरं
Join us  
Trending Stories
1
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
2
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
3
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
4
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
5
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
6
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
7
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
8
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
9
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
10
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
11
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
12
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
13
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
14
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
15
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
16
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
17
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
18
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
19
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
20
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर

शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2024 16:21 IST

Shirur Lok Sabha: प्रकृतीत सुधारणा झाली असून पूर्ण ताकदीने शिवाजीराव आढळराव पाटील यांचा प्रचार करणार असल्याचं वळसे पाटलांनी जाहीर केलं आहे.

Dilip Walse Patil ( Marathi News ) :शिरूर लोकसभा मतदारसंघात यंदा राष्ट्रवादीचेच दोन उमेदवार आमने-सामने आले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीकडून माजी खासदार शिवाजीराव आढळराव निवडणूक रिंगणात आहेत, तर त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे निवडणूक लढवत आहेत. आढळराव पाटील यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने शिरूर लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या विविध विधानसभा मतदारसंघांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या राष्ट्रवादीच्या आमदारांची ताकद आढळरावांच्या पाठीशी उभी राहणार आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री दिलीप वळसे पाटील यांचंही शिरूर लोकसभा मतदारसंघात मोठं राजकीय वलय आहे. मात्र वळसे पाटलांना दुखापत झाल्याने ते मागील काही आठवड्यांपासून प्रचारातून दूर होते. परंतु आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून पूर्ण ताकदीने शिवाजीराव आढळराव पाटील यांचा प्रचार करणार असल्याचं वळसे पाटलांनी जाहीर केलं आहे.

शिरूर लोकसभेबाबत बोलताना दिलीप वळसे पाटील म्हणाले की, "माझी प्रकृती आता एकदम ओके आहे. गेल्या १५ दिवसांत त्यामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली आहे. प्रकृतीत सुधारणा झाल्याबरोबर मी माझ्या मतदारसंघात जाऊन जनतेची चौकशी करणार आहे आणि शक्य होईल तेवढी शिवाजीराव आढळराव पाटील यांना निवडून आणण्यासाठी मदत करणार आहे. ते नक्कीच विजयी होतील," असा विश्वासही वळसे पाटलांनी व्यक्त केला आहे.

आंबेगाव तालुक्याच्या राजकारणावर एकहाती वर्चस्व असणारे आणि आजूबाजूच्या तालुक्यांमध्येही चांगला जनसंपर्क असणारे दिलीप वळसे पाटील हे पुन्हा महायुतीच्या प्रचारात सक्रिय होणार असल्याने शिवाजीराव आढळराव पाटील यांची बाजू आणखी भक्कम होण्यास मदत होणार आहे.

दरम्यान, मागील महिन्यात घरात झालेल्या दुर्घटनेत दिलीप वळसे पाटील यांच्या खुब्याला मार लागला होता. तसंच त्यांचा हातही फ्रॅक्चर झाला होता. त्यांच्यावर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. जवळपास महिनाभर उपचार घेतल्यानंतर आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे.

शिरूर लोकसभेत कशी आहे राजकीय स्थिती?

लोकसभा निवडणुकांच्या तोंडवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवाजीराव आढळराव पाटलांनी राष्ट्रवादीचं घड्याळ हाती घेतलं. २००४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत गेलेल्या शिवाजीराव आढळराव पाटलांची तब्बल दोन दशकांनंतर घरवापसी झाली आहे. अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी महायुतीत सहभागी झाल्यामुळे अनेक मतदारसंघांमधील राजकीय गणिते बदलली आहेत. शिरूर लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवार यांच्या नेतृत्वात काम करण्याचा निर्णय घेतला. मात्र तरीही महायुतीच्या जागावाटपात शिरूरची जागा आपल्याकडेच राहायला हवी, अशी आग्रही भूमिका अजित पवार यांनी घेतली. त्यामुळे या मतदारसंघात महायुतीचा उमेदवार नक्की कोण असणार, याबाबत मोठी चर्चा झाली. महायुतीत झालेल्या खलबतांनंतर शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव हे राष्ट्रवादीच्या चिन्हावर या मतदारसंघातून निवडणूक लढवतील, हे निश्चित झालं. त्यामुळे आढळराव पाटलांनी मागील महिन्यात राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि त्यानंतर त्यांची उमेदवारीही घोषित झाली.

टॅग्स :shirur-pcशिरूरShivajirao Adhalraoशिवाजीराव आढळरावDilip Walse Patilदिलीप वळसे पाटीलmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४