शिरूर खरेदी-विक्री संघावर राष्ट्रवादीचे वर्चस्व
By Admin | Updated: June 12, 2017 01:15 IST2017-06-12T01:15:00+5:302017-06-12T01:15:00+5:30
तालुका खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व प्राप्त केले. संघाच्या १७ पैकी १४ जागा राष्ट्रवादीने राखल्या. तीन जागा भाजपाला मिळाल्या.

शिरूर खरेदी-विक्री संघावर राष्ट्रवादीचे वर्चस्व
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरूर : तालुका खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व प्राप्त केले. संघाच्या १७ पैकी १४ जागा राष्ट्रवादीने राखल्या. तीन जागा भाजपाला मिळाल्या.
१७ जागांपैकी नऊ जागा बिनविरोध झाल्याने आज आठ जागांसाठी निवडणूक घेण्यात आली. यात राष्ट्रवादीने पाच जागा जिंकल्या. बिनविरोध झालेले सर्व नऊ संचालक हे राष्ट्रवादीचे असल्याने राष्ट्रवादीने १४ जागांवर विजय मिळवून सत्ता अबाधित राखली.
विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला हार पत्कारावी लागली होती. मात्र, त्यानंतर झालेल्या रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना, नगरपरिषद, जिल्हा परिषद, बाजार समिती व आजच्या खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने भाजपाला धूळ चारली. आमदार बाबूराव पाचर्णे यांची यामुळे तालुक्यात पीछेहाट झाली. त्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात आल्याची चर्चा यानिमित्ताने तालुक्यात रंगू लागली. बाजार समिती निवडणुकीत हार पत्करावी लागल्याने हताश झालेल्या भाजपाला खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीसाठी सर्व जागांसाठी उमेदवारही मिळाले नाहीत. राष्ट्रवादीने सुरुवातीलाच नऊ संचालक बिनविरोध करून आपले वर्चस्व सिद्ध केले व आज पाच जागा जिंकून पुन्हा भाजपाला धोबीपछाड दिला.
बिनविरोध झालेल्या संचालकांची नावे पुढीलप्रमाणे : सोसायटी मतदार संघ : दत्तात्रय त्रिंबक कदम (कारेगाव मतदारसंघ),राजेंद्र उत्तम नरवडे (रांजणगाव मतदारसंघ), गुलाब बबनराव सातपुते (तळेगाव ढमढेरे), सुरेश रामराव पलांडे (धामारी), महिला प्रतिनिधी : सुजाता राजेंद्र नरवडे व मनीषा सुनील शेलार. विमुक्त जाती व जमाती किंवा विशेष मागास प्रवर्ग : शरद वसंत कालेवार, अनुसूचित जाती किंवा जमाती उत्तम रामचंद्र सोनवणे, इतर मागासवर्ग सदस्य संभाजी काळुराम भूजबळ.
आज निवडूण आलेले उमेदवार : १.मांडवगण फराटा मतदारसंघ : अर्जुनराव साहेबराव नागवडे (राष्ट्रवादी) १३ मते विरुद्ध संजयराव साहेबराव घाडगे (०७) २. वडगाव रासाई प्रदीप सखाराम सोनवणे (भाजपा) १२ मते विरुद्ध सचिन प्रतापराव पवार (राष्ट्रवादी) ०९ मते. ३. नामदेव जयवंत गिरमकर (राष्ट्रवादी) १३ मते विरुद्ध गणेश सूर्यकांत बेंद्रे ०१ मते. ४. आबा गणपत थोरात (भाजपा ०५ मते) विरुद्ध दीपक बाळासाहेब तळोले ०४ मते. ५. संतोष बबनराव मोरे (भाजपा २६) विरुद्ध महेंद्र सुरेश पाचर्णे (०० मते यामध्ये पाचर्णे यांनी मोरे यांना पाठिंबा दिला होता) ६. निळोबा चंदरराव टेमगिरे (१० मते) विरुद्ध सागर शहाजी गायकवाड (राष्ट्रवादी ०८मते) ७. वैयक्तिक सभासद मतदारसंघ : बाळासाहेब अर्जुनराव नागवडे ५६४ , सर्जेराव बाबूराव नागवडे ५१०