शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
3
भारताविरोधातील कट उधळला! शोपियानात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
4
अमेरिकेचा यू-टर्न; ज्या व्यक्तीला कुख्यात दहशतवादी घोषित केले, त्याचीच ट्रम्प यांनी घेतली भेट
5
FD वर व्याजासोबत ५ लाख रुपयांचे विमा कव्हर; ठेवीवर कर्ज घेण्याचीही सुविधा
6
तुम्ही फक्त एवढे काम करा, आम्ही पाकिस्तानातून स्वातंत्र होऊ; बलूचची भारताकडे मागणी
7
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
8
Gold Rates 14 May : सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
9
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
10
बापमाणूस! पत्नीच्या मृत्यूनंतर चिमुकल्या लेकीला सोबत घेऊन बाबा करतोय काम, पाणावले डोळे
11
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
12
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
13
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
14
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
15
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
16
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
17
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
18
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
19
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
20
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई

Gram Panchayat Result Pune: राष्ट्रवादीने बालेकिल्ला सोडलाच नाही; बारामतीत वर्चस्व कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2022 14:24 IST

वाणेवाडी, मुरूम, वाघळवाडी व पणदरे ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणुक अत्यंत चुरशीची ठरली

सोमेश्वरनगर : संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून असलेल्या वाणेवाडी, मुरूम, वाघळवाडी व पणदरे ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणुक अत्यंत चुरशीची ठरली. पणदरेत माळेगावचे माजी चेअरमन तानाजी कोकरे यांच्या पॅनेलने सरपंचपदाची बाजी मारली, मात्र सत्यजित जगताप व विक्रम कोकरे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी उभ्या  केलेल्या पॅनेलला गावकऱ्यांनी मोठी साथ दिल्याने त्यांच्या गटाचे ८ उमेदवार विजयी झाले. तर तानाजी कोकरे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने ७ जागा व सरपंचपदाची जागा अजित सोनवणे यांनी जिंकली.        पळशी ग्रामपंचायतीत जिल्हा परीषदेचे माजी सभापती भाऊसाहेब करे व माजी उपसरपंच माणिक काळे, राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष तानाजी कोळेकर व त्यांच्या सहकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील जय हनुमान ग्रामविकास परिवर्तन पॅनेलने बाजी मारली. सरपंचपदाच्या जागेसह १० पैकी १० जागा जिंकून एकतर्फी वर्चस्व प्रस्थापित केले.        कुरणेवाडी गावात बारामती दूध संघाचे अध्यक्ष संदीप जगताप यांना मोठा धक्का बसला असून कुरणेवाडी काळभोर गटाने ६ विरूध्द २ जागांनी संदिप जगताप यांना काळभोर गटाने धक्का दिला आहे. हनुमंत काळभोर व सूर्यकांत काळभोर यांनी जगताप यांनी जगताप गटाला कडवे आव्हान दिल्याने गावच्या सरपंचपदी आशा किसन काळभोर या निवडून आल्या आहेत. येथे वारूळबाबा स्वाभिमान पॅनेलने बाजी मारली आहे.

गडदरवाडीत सतिश काकडे, प्रमोद काकडे व सोमेश्वरचे संचालक अभिजित काकडे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या श्री सोमेश्वर ग्रामविकास पॅनेलने बाजी मारत सरपंचपदासह सर्व जागा जिंकल्या आहेत. येथे सोमेश्वरचे संचालक शैलेश रासकर व लक्ष्मण गोफणे यांच्या पॅनेलचा येथे पराभव झाला आहे.          वाणेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या उमेदवार गीतांजली दिग्विजय जगताप यांनी गाव पॅनेलला धक्का देत अपक्ष म्हणून निवडून आल्या आहेत. गाव पॅनेल असलेला हनुमान ग्रामविकास पॅनेलच्या सरपंचपदाच्या उमेदवार विद्या भोसले यांचा पराभव झाला आहे. मुरूम येथे नंदकुमार शिंगटे हे सरपंचपदाचे उमेदवार निवडून आले आहेत. तर १३ पैकी ७ उमेदवार निवडून आले आहेत.

सरपंचपदी निवडुन आलेले ग्रामपंचायत निहाय उमेदवार

बारामती तालुका

१)वाणेवाडी ग्रामपंचायत - गीतांजली जगताप२)कुरणेवाडी - आशा किसन काळभोर३)मुरुम - संजयकुमार नामदेव शिंगटे४)पणदरे - अजय कृष्णा सोनवणे५)लोणी भापकर - गीतांजली रविंद्र भापकर६)सोरटेवाडी - भारती अनिरुध्द सोरटे७)वाघळवाडी - हेमंत विलास गायकवाड८)मोरगांव - अलका पोपट तावरे९)पळशी - काळे ताई१०)गडदरवाडी - मालन पांडुरंग गडदरे११)मासाळवाडी - मुरलीधर किसन ठोंबरे१२)काऱ्हाटी - दिपाली योगेश लोणकर१३)सोनकसवाडी—राणी सतीश कोकरे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतPuneपुणेElectionनिवडणूकSocialसामाजिकBaramatiबारामती