शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
3
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
4
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
5
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
6
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
7
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
8
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
9
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
10
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
11
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
12
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
13
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
14
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
15
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
16
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
17
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
18
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
19
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
20
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश

"फार महत्त्व देऊ नका"; जगदीश मुळीकांनी केलेल्या टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2024 14:56 IST

Ajit Pawar : भाजप नेते जगदीश मुळीक यांनी केलेल्या टीकेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केले

Ajit Pawar on Jagdis Mulik : राज्यात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु असतानाच पुण्यात महायुतीमध्ये श्रेयवादाची लढाई सुरु झाल्याचे पाहायला मिळतंय. पुण्यात महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. याला कारण ठरलं आहे वडगाव शेरीमध्ये होणाऱ्या विविध विकास कामांच्या भूमिपूजन. या भूमिपूजनाच्या कार्यक्रमावरुन भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे यांच्यावर टीका केली. महायुतीचा धर्म काय भाजप आणि शिवसेनेनीच पाळायचा का? असा सवाल करत मुळीक यांनी टिंगरेंना लक्ष्य केलं. त्यावरुन आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या सगळ्या प्रकाराबाबत भाष्य केलं.

वडगाव शेरीच्या आजी माजी आमदारांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरु झालीय. विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांच्या मतदारसंघातील ३०० कोटींच्या विकास कामाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. त्याची जोरदार जाहिरातबाजी करण्यात आली आहे. मात्र या जाहिरातीवरुन भाजपचे सुनील टिंगरे आक्रमक झाले आहेत. वडगाव शेरीतील विकास कामांच्या जाहिरातीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो नसल्यामुळे  जगदीश मुळीक यांनी आक्षेप घेतला महायुतीचा धर्म काय भाजप आणि शिवसेनेनीच पाळायचा का? असा सवाल जगदीश मुळीक यांनी केला.

"वडगाव शेरी विधानसभेत महायुतीचा धर्म काय भाजप आणि शिवसेनेनीच पाळायचा का? महायुतीचा धर्म पाळणं, ही महायुतीतल्या प्रत्येक घटक पक्षाची जबाबदारी आहे, पण वडगावशेरीच्या या आमदारांना महायुतीचा विसर पडला आहे!वडगावशेरीमध्ये तीनशे कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन होत आहे, हे नागरिकांच्या दृष्टीने आनंदाची गोष्ट आहे. पण या विकासकामांचा पाठपुरावा आमच्यासारख्या महायुतीतील मंडळींनी केला आहे, हे आमदार जाणीपूर्वक विसरत आहेत! तीनशे कोटींच्या विकासकामांचा निधी मिळतो, तेव्हा त्यात राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री. एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांचंही योगदान आहे, पण त्यांचा साधा फोटो टाकण्याचे सौजन्यही आमदार महोदय श्रेय लाटण्याच्या स्वार्थी भावनेत दाखवले नाही," असं म्हणत मुळीक यांनी टिंगरेंवर निशाणा साधला.

त्यानंतर माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत भाष्य केलं आहे. "या गोष्टीला तुम्ही फार काही महत्त्व देऊ नका. आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस तिघांनी मिळून हे सगळं ठरवलेलं आहे. तशा पद्धतीने काम सुरु आहे. जर याच्यातून कुणाचे समज गैरसमज झालेले असतील तर मी सांगितलेल्या गोष्टीची त्यांनी नोंद घ्यावी," असं अजित पवार म्हणाले.

वरचे नेते निर्णय घेतील - सुनील टिंगरे  "कार्यक्रमाची पत्रिका काढण्याचे काम प्रशासनाचे असते. त्यामुळे नियमानुसार त्यांनी ते केले. ज्यावेळी एखाद्या पक्षाचा नेता माझ्या मतदारसंघात येणार असेल तर आमचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमार्फत स्वागतेचे बॅनर लावले जातात. मला तर असं कुठेही जाणवत नाही. जे काही आहे त्याचा निर्णय वरचे नेते घेतील आपण त्यावर कशाला भाष्य करायचं," असं आमदार सुनील टिंगरे म्हणाले. 

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारjagdish mulikजगदीश मुळीकsunil tingreसुनील टिंगरे