शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Video: भाजपची पोपटपंची करणाऱ्या विचित्रा वाघचा धिक्कार असो; पुण्यात राष्ट्रवादीचे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2022 13:51 IST

एका मुलीच्या भावनांचा गैरवापर करत स्वतः ची राजकीय पोळी भाजणाऱ्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने राणी लक्ष्मीबाई पुतळ्यासमोर निषेध आंदोलन करण्यात आले

पुणे : एका मुलीच्या भावनांचा गैरवापर करत स्वतः ची राजकीय पोळी भाजणाऱ्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने राणी लक्ष्मीबाई पुतळ्यासमोर निषेध आंदोलन करण्यात आले.

गेल्या दोन महिन्यांपासून भाजप नेत्या चित्रा वाघ या माध्यमांसमोर वारंवार काही नेत्यांवर बलात्काराचे आरोप करत एका पीडित मुलीची कथित व्यथा समाज माध्यमांमध्ये सांगत होत्या. या सर्व काळात चित्रा वाघ यांनी अतिशय घाणेरडे आरोप करत संबंधित नेत्याबाबत अनेक वक्तव्ये केली. अखेर या प्रकरणातील मुलीने काल स्वतः पत्रकार बांधवांना भेटून हे सर्व आरोप खोटे असून चित्रा वाघ यांनी जाणीवपूर्वक हे सर्व आरोप करण्यास भाग पाडले असे सांगितले. हा प्रकार अत्यंत संतापजनक असून आपले राजकीय पोळी भाजण्यासाठी चित्रा वाघ यांनी या मुलीच्या भावनांचा निव्वळ वापर केला. राजकारणात दावे-प्रतिदावे आरोप-प्रत्यारोप करायचे असतात, परंतु हे आरोप प्रत्यारोप करण्यासाठी एखाद्या व्यक्तीला बलात्कारासारख्या गुन्ह्यात अडकवणे, एखाद्या मुलीच्या भावनांशी खेळणे हे खरोखर घृणास्पद असून, चित्रा वाघ यांच्या या वर्तणुकीमुळे सर्वत्र संतापाची लाट असल्याचे आंदोलनकर्त्यांनी यावेळी  सांगितले. 

भारतीय जनता पार्टीची हीच संस्कृती आहे का....?

ज्या महाराष्ट्र राज्यात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, पहिल्या शिक्षिका फातीमा, पहिल्या डॉक्टर आनंदीबाई या सर्व थोर महिलांची परंपरा या महाराष्ट्राला आहे, अशा या महाराष्ट्राच्या भूमीत एक महिला दुसऱ्या महिलेचा वापर स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी करते यापेक्षा दुसरे दुर्दैव कुठले असेल. या ज्या राजकीय पक्षाच्या सदस्य आहेत, त्या भारतीय जनता पार्टीची हीच संस्कृती आहे का....? असा सवाल राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या शहराध्यक्षा सुषमा सातपुते यांनी यावेळी विचारला.  तसेच अशा प्रकारे महिलांच्या भावनांशी खेळणाऱ्या चित्रा वाघ यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी देखील राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने या आंदोलन प्रसंगी करण्यात आली.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसChitra Waghचित्रा वाघBJPभाजपाGovernmentसरकार