नाझरे क. प. आणि नाझरे सुपेतील विकासकामांचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:08 IST2021-06-22T04:08:41+5:302021-06-22T04:08:41+5:30

पुरंदर तालुक्यातील नाझरे क. प. आणि नाझरे सुपे या दोन्ही गावांतील सुमारे साडेपाच कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचा शुभारंभ खा. ...

Nazareth c. W. And launch of development work in Nazareth | नाझरे क. प. आणि नाझरे सुपेतील विकासकामांचा शुभारंभ

नाझरे क. प. आणि नाझरे सुपेतील विकासकामांचा शुभारंभ

पुरंदर तालुक्यातील नाझरे क. प. आणि नाझरे सुपे या दोन्ही गावांतील सुमारे साडेपाच कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचा शुभारंभ खा. सुळे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुरंदर हवेलीचे आ. संजय जगताप होते.

या वेळी बोलताना त्या पुढे म्हणाल्या, महाराष्ट्रात कोविड महामारीवर मात करण्यासाठी खूप चांगले काम होत आहे. पुरंदर तालुक्यातील परिस्थिती ही समाधानकारक आहे. अजूनही खूप काळजी घ्यावी लागणार आहे. मात्र यामुळे विकासकामे रखडली जाऊ नयेत याचीही काळजी घेतली जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार निधी कमी पडू देणार नाहीत.

नाझरे कप व नाझरे सुपे येथे आ. साडेपाच कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचा आ. शुभारंभ होत आहे. अजून ही या दोन्ही गावांसाठी अडीच कोटी रुपयांच्या निधीची गरज आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये प्रयत्न सुरू आहेत. आ. अत्यंत गरजेची व महत्त्वाची काम सुरू होत आहेत. कोविडकाळात पुरंदरत्सीयांनी चांगला प्रतिसाद दिल्यामुळेच आजची परिस्थिती आटोक्यात आली आहे. विकासकामे ही सुरूच राहतील अशी ग्वाही आ. संजय जगताप यांनी यावेळी दिली.

यावेळी या गटाचे जि. प. सदस्य दत्ता झुरंगे यांचेही भाषण झाले. नाझरे क. प. च्या सरपंच मनीषा नाझीरकर यांनी विविध विकासकामांच्या मागण्या केल्या. कार्यक्रमाला माजी आ. अशोक टेकवडे, जिल्हा बँकेचे संचालक डॉ दिगंबर दुर्गाडे, माजी जि व सदस्य सुदाम इंगळे, राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसचे पदाधिकारी, नाझरे सुपेचे सरपंच भाऊसाहेब कापरे आदी मान्यवर उपास्थित होते.

स्वागत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माणिक झेंडे यांनी केले.आभार राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष संदीप चिकणे यांनी मानले.

नाझरे क. प. येथील विकासकामांच्या शुभारंभ प्रसंगी खा. सुप्रिया सुळे, आ संजय जगताप व इतर

Web Title: Nazareth c. W. And launch of development work in Nazareth