शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
'पोलिसांनी त्याची हत्या केली...'! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
3
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
4
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
5
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
6
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
7
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
8
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
9
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
10
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
11
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
12
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
13
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
14
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
15
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
16
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
17
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
18
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
19
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
20
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन

नाट्य परिषद पुणे शाखेची पंचवार्षिक निवडणूक तीन पँनेलमध्ये रंगणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2018 3:02 PM

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणे शाखेच्या पंचवार्षिक निवडणुकीला रंग चढण्यास सुरूवात झाली आहे. यंदाची निवडणूक तीन पँनेलमध्ये रंगणार आहे.

ठळक मुद्देनाट्य परिषद पुणे शाखेच्या कार्यकारिणीच्या १९ जागांसाठी निवडणूक जाहीरटिळक स्मारक मंदिर येथील नाट्य परिषद कार्यालयामध्ये ७ आॅक्टोबर रोजी मतदान होणार

पुणे: अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणे शाखेच्या पंचवार्षिक निवडणुकीला रंग चढण्यास सुरूवात झाली आहे. यंदाची निवडणूक तीन पँनेलमध्ये रंगणार आहे. नाट्य परिषद पुणे शाखेच्या विद्यामान कार्यकारिणीतील उपाध्यक्ष आणि नाट्यसंमेलनाध्यक्ष  कीर्ती शिलेदार, अविनाश देशमुख आणि सदस्य विजय वांकर हे निवडणूक रिंगणात उभे राहण्याची शक्यता आहे. शाखा अध्यक्ष सुरेश देशमुख यांच्यासह डॉ. सतीश देसाई आणि प्रदीपकुमार कांबळे हे माजी अध्यक्ष अशी तीन स्वतंत्र पॅनेल निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. आजमितीला ४५ उमेदवारी अर्जांची विक्री झाली आहे. नाट्य परिषद पुणे शाखेच्या कार्यकारिणीच्या १९ जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली असून मंगळवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला.याशिवाय अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले आणि प्रमुख कार्यवाह दीपक रेगे देशमुख यांच्या पॅनेलमध्ये आहेत. तर, नाट्यअभिनेत्री भाग्यश्री देसाई आणि निकिता मोघे यांचा डॉ. सतीश देसाई यांच्या पॅनेलमध्ये समावेश आहे. प्रदीकुमार कांबळे यांनी आपल्या पॅनेलमध्ये नाट्यव्यवस्थापकांना संधी दिली आहे. निवडणुकीतील उमेदवारांची भाऊगर्दी पाहाता ही संख्या अधिक वाढल्यानंतर मोठ्या आकाराची मतपत्रिका छापण्याची वेळ निवडणूक यंत्रणेवर येणार आहे.    इच्छुक उमेदवारांना उद्या (२७ सप्टेंबर) अर्ज दाखल करता येणार आहेत. उमेदवारांच्या अर्जांची छाननी होऊन शनिवारी (२९ सप्टेंबर) निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे. परिषदेचे दीड हजार आजीव सभासद मतदार आहेत. टिळक स्मारक मंदिर येथील नाट्य परिषद कार्यालयामध्ये ७ आॅक्टोबर रोजी मतदान होणार आहे. त्याच दिवशी सायंकाळी मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर सर्वाधिक मते संपादन करणाºया १९ उमेदवारांना विजयी घोषित करण्यात येईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी शिरीषकुमार जानोरकर यांनी दिली.  दरम्यान, कार्यकारिणी सदस्यपदासाठी निवडणूक रिंगणात उभे राहणाºया उमेदवाराकडून दीड हजार रुपये अनामत रक्कम नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेनेच निश्चित केली आहे. त्या अनामत रकमेच्या माध्यमातून नाट्य परिषदेच्या कोशात भर पडणार आहे. या निवडणुकीमध्ये ५० उमेदवार रिंगणात राहिले तरी पुणे शाखेच्या कोशामध्ये ७५ हजार रुपयांची भर पडणार असल्याचे जानोरकर यांनी सांगितले. 

टॅग्स :Puneपुणे