राष्ट्रवादी पश्चिम महाराष्ट्रवादी पक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 04:56 IST2018-05-02T04:56:56+5:302018-05-02T04:56:56+5:30

बारामतीसह पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची दादागिरी मोडीत काढत भाजपा ताठ मानेने उभा राहत आहे.

Nationalist West Maharashtra Party | राष्ट्रवादी पश्चिम महाराष्ट्रवादी पक्ष

राष्ट्रवादी पश्चिम महाराष्ट्रवादी पक्ष

बारामती : बारामतीसह पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची दादागिरी मोडीत काढत भाजपा ताठ मानेने उभा राहत आहे. तसेच पक्षाचे विदर्भ, मराठवाडा, कोकणात या भागात तुरळक अस्तित्व आहे. या पक्षाला राज्यस्तरीय स्वरूप नाही. त्यामुळे आगामी काळातील सर्व निवडणुका भाजपा जिंकेल. इंदापूर, बारामतीमध्ये भाजपाचा वेग वाढत आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष केवळ पश्चिम महाराष्ट्रवादी पक्ष राहिला आहे, अशी खरमरीत टीका पालकमंत्री गिरीश बापट यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केली. बारामती तालुक्यातील विविध उद्घाटने पालकमंत्री बापट यांच्या हस्ते करण्यात आली. या वेळी माळेगाव (ता. बारामती) येथे आयोजित पत्रकार परिषदेत बापट बोलत होते.
या वेळी बापट यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली. बापट म्हणाले, ‘‘राष्ट्रवादी काँग्रेसने काढलेले मोर्चे हे हल्लाबोल नसून डल्लाबोल मोर्चे आहेत. मागच्या १५ ते २० वर्षांत मारलेल्या डल्ल्यांमुळे कामे करता आले नाहीत. सिंचन, रस्ते, जलयुक्त शिवार, पाणीपुरवठा आदींबाबत निर्णय जनतेच्याविरोधात घेतले.’’

Web Title: Nationalist West Maharashtra Party