शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

"NCP ला पुन्हा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळेल" निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर जयंत पाटलांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2023 13:03 IST

राष्ट्रवादीकडून भाजपच्या बाजूने कोणतीही भुमिका घेतलेली नाही...

पुणे : काल राष्ट्रीय निवडणूक आयोगाने देशातील तीन पक्षांचा राष्ट्रीय दर्जा काढून घेतला. त्यामध्ये महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचाही समावेश आहे. या निर्णयानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, देशातील वेगवेगळ्या राज्यात निवडणूका झाल्या. त्यानंतर काही पक्षांबाबत निवडणूक आयोगाने निर्णय घेतला आहे. फक्त राष्ट्रवादीबाबत असा निर्णय घेण्यात आला आहे असे नाही. वेगवेगळ्या राज्यात मते घेण्यात काही कमतरता आली असेल, पण येणाऱ्या निवडणूकांमधे हा दर्जा पुन्हा मिळेल, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला.

पाटील पुढे म्हणाले, कर्नाटक आणि इतर राज्यातील निवडणूकांमध्ये आम्ही राष्ट्रीय पक्ष हा दर्जा पुन्हा सहज मिळवू. हा पक्षासाठी सेटबॅक नाही. कारण राज्यात पक्षाचे घड्याळ हे चिन्ह कायम आहे. येत्या तीन- चार महिन्यांत हा दर्जा पुन्हा मिळेल. काही पक्षांची काही काळासाठी क्रेझ असते. आप या पक्षाने अनेक आश्वासनं दिली त्यानंतर त्यांचा पक्ष वाढला. आम्ही मात्र शक्य तेवढीच आश्वासने देतो. लोकांच्या पैशांवर आश्वासने देणे असे आम्ही करत आहोत नाही. आपने पंजाबमधे जी आश्वासने दिली ती पुर्ण होतायत का हे बघितलं पाहिजे, असंही पाटील म्हणाले.

अदानींच्या प्रकरणात चौकशीला विरोध नाही

राष्ट्रवादीकडून भाजपच्या बाजूने कोणतीही भुमिका घेतलेली नाही. भाजप स्वतः तशी समजत करुन घेत असेल. अदानींच्या प्रकरणात चौकशीला विरोध नाही. फक्त जेपीसीच्या उपयोगाबद्दल शंका असल्यानेच पवार साहेबांनी ते वक्तव्य केलं. सावरकर हे महाराष्ट्रातील आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीकडून सावरकरांबाबत भुमिका घेण्यात आली आहे, असं पाटील म्हणाले.

प्रशांत जगताप पुणे लोकसभा लढणार?

प्रशांत जगताप हे चांगले कार्यकर्ते आहेत. त्यांना लोकसभेची निवडणूक उमेदवारी मिळावी अशी आमच्या पक्षातील अनेकांची इच्छा आहे. अर्थात जर निवडणूक होणार असेल तर प्रशांत जगताप यांना उमेदवारी मिळावी अशी आमच्या पक्षाची मागणी आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीत याबाबत आम्ही चर्चा करु. चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेबद्दल केलेल्या विधानावर विश्वास कसा ठेवायचा? कारण त्याला खूप वर्ष झाली आहेत.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलPuneपुणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग