शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘राष्ट्रवाद’ एका मर्यादेनंतर संकोचणारी गोष्ट : रंगनाथ पठारे     

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2019 18:26 IST

आज आपण विनाशाच्या उंबरठ्यावर आहे...

पुणे : जग अशा टप्प्यावर आहे, जिथल्या सांस्कृतिक व सामाजिक परिस्थितीमागे राजकीय संदर्भ आहेत. जे आधी उदारमतवादी होते ते का बदलत गेले? याचा विचार करणे गरजेचे आहे.आज आपण विनाशाच्या उंबरठ्यावर असून, मानव प्रजाती म्हणून कोणत्या कठड्यावर उभे आहोत. याचं भान बाळगणं आवश्यक आहे.‘राष्ट्रवादा’ने  आपल्यात भिंती निर्माण केल्या असून,‘राष्ट्रवाद’ ही एका मर्यादेनंतर आपल्या विचारांचा संकोच करणारीच गोष्ट ठरत आहे, अशा शब्दातं ज्येष्ठ  साहित्यिक  प्रा. रंगनाथ पठारे यांनी  ‘राष्ट्रवादा’वर परखडपणे भाष्य केले.  पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या सांस्कृतिक कट्टा' उपक्रमांतर्गत त्यांनी संवाद साधला. यावेळी संघाचे सरचिटणीस चंद्रकांत हंचाटे, खजिनदार सुनील जगताप, उपाध्यक्ष सुकृत मोकाशी उपस्थित होते.’राष्ट्रवाद’ ही संकल्पना जगभरात फोफावत आहे. याच राष्ट्रवादाने आपल्यात भिंती निर्माण केल्या आहेत, असे स्पष्ट करीत भिंती बांधून लोकांचे स्थलांतर थांबवता येणार नाही अशी मार्मिक टिप्पणी प्रा.पठारे यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अविचारी वक्त्यांवर केली. प्रत्येकाला जन्मापासून अस्तित्वाचे भय असते.  एक असुरक्षितता जाणवत असते. हे असुरक्षिततेचे भय मरेपर्यंत कायम राहते. त्यावर मात करायची असेल तर समाजात बंधुतेची भावना अस्तिवात आणावी लागेल. मात्र हे  काहीस अवघड असल्याचे ते म्हणाले.  ’पत्रकारिता’ जबाबदारीने निर्भीडपणे लेखन करणारा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे.  सध्या सामान्य माणूस भीतीच्या सावटाखाली आहे. त्या स्थितीत त्यांना निर्भय बनविण्याचे मोठे काम माध्यमे करू शकतात.टीआरपी पलीकडे नैतिकता म्हणून काही गोष्ट आहे, सामान्यांना जाणून घेणं अधिक महत्वाचं आहे.  मराठीला ‘अभिजात’ भाषेचा दर्जा कधी मिळणार? याविषयी छेडले असता पठारे म्हणाले, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याबाबत आम्ही तयार केलेला मसुदा उत्तम असाच आहे. सहा वर्षे अभिजाततेचे घोंगडे भिजत पडले आहे.  करायचं कुणी? दबाव टाकायचं कुणी? मराठी खासदार सांस्कृतीक मंत्र्यानी पुढे रेटायला हवं. पक्षांनी अजेंड्यावर विषय घेतला जायला हवा.आपल्या लोकानी दर्जा नसतानाही सांस्कृतिक पूर्वजांनी चांगले काम करून ठेवले आहे. इंग्रज नसते तर देशावर मराठ्यांनी राज्य केले असते.भाषावर प्रांतरचनेमुळे मराठीचे मोठे नुकसान झाले. देशभरात मराठीचा पसारा होता. अगदी पेशावरपासून तंजावरपर्यंत मराठी शाळा होत्या. मात्र, प्रांतरचनेमुळे विस्तार क्षीण झाला. मराठीपणाचा विस्तार जपायला हवा. बोली हे सांस्कृतिक सामर्थ्य आहे. त्यामुळे प्रमाणभाषा समृद्ध होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

......

’बोन्साय’ व्हायचंय की ’वडाचं झाड’वृत्तपत्रात लेखन प्रसिद्ध झाले की स्वत:ला  ‘साहित्यिक’ समजण्यास सुरूवात होते. मात्र लेखनाला एकप्रकारचा संयम लागतो. साक्षरतेची संस्कृती तुम्हाला ’बोन्साय’ करायला टपली आहे.  तुम्हाला ’बोन्साय’ व्हायचंय की ’वडाच झाड’ व्हायचंय हे ठरवायला हवे असे रंगनाथ पठारे यांनी ’लेखकां’ना सुनावले. 

टॅग्स :PuneपुणेHindutvaहिंदुत्वmarathaमराठाGovernmentसरकार