शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

पुण्यातील एमआयटीमध्ये १० ते १२ जानेवारी दरम्यान भरणार ‘नॅशनल टिचर्स काँग्रेस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2018 7:17 PM

एमआयटीच्यावतीने दुसऱ्या नॅशनल टिचर्स काँग्रेसचे आयोजन दि. १० ते १२ जानेवारी २०१८ या कालावधीत कोथरुड येथील एमआयटीच्या प्रांगणात करण्यात आले आहे. याचे उद्घाटन आध्यात्मिक गुरू दलाई लामा यांच्या हस्ते होणार आहे. 

ठळक मुद्देपरिषदेमध्ये देशभरातून ८,००० प्राध्यापक होणार सहभागी दि. १० जानेवारी रोजी, तर समारोप दि. १२ जानेवारी २०१८ रोजी होणार उद्घाटन समारंभ

पुणे : एमआयटीच्यावतीने दुसऱ्या नॅशनल टिचर्स काँग्रेसचे आयोजन दि. १० ते १२ जानेवारी २०१८ या कालावधीत कोथरुड येथील एमआयटीच्या प्रांगणात करण्यात आले आहे. याचे उद्घाटन आध्यात्मिक गुरू दलाई लामा यांच्या हस्ते होणार आहे. नॅशनल टीचर्स काँग्रेसचे प्रमुख निमंत्रक प्रा. राहुल कराड, प्राचार्य महासंघाचे उपाध्यक्ष डॉ. नंदकुमार निकम,  प्राचार्य महासंघाचे महासचिव डॉ. सुधाकरराव जाधवर, प्रा. जय गोरे व अधिष्ठाता डॉ. आर. एम. चिटणीस यांनी नॅशनल कॉन्फरन्सबाबत माहिती दिली. या परिषदेमध्ये देशभरातून ८,००० प्राध्यापक सहभागी होणार आहेत. या तीन दिवसांच्या परिषदेचा उद्घाटन समारंभ बुधवार, दि. १० जानेवारी २०१८ रोजी, तर समारोप शुक्रवार, दि. १२ जानेवारी २०१८ रोजी होणार आहे. तीन दिवसीय परिषदेत एकूण सात सत्रे ठेवण्यात आली आहेत. भारतातील उच्च शिक्षण : आढावा आणि भावी दिशा, उच्च शिक्षणातील गुणवत्ता- सत्य आणि सामोपचार, उच्च शिक्षणात तंत्रज्ञानाचा उपयोग- फायदे विरूद्ध अडथळे,शिक्षकांचे प्रशिक्षण, शिक्षणाचे अर्थशास्त्र आदी विषयांवर या परिषदेमध्ये चर्चा होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंग, डॉ. ए.बी. देशपांडे, डॉ. ए.के. सेन गुप्ता, डॉ.अनिल के गुप्ता, डॉ.अनिल माहेश्वरी, डॉ.अनिल सहस्त्रबुद्धे, शास्त्रज्ञ डॉ.सीएनआर राव, डॉ.देवी सिंग, डॉ.दिलीप रांजेकर, न्यायमूर्ती हेगडे, डॉ.एन.एम.कोंडप, डॉ. मनिष कुमार आदी मान्यवर या परिषदेमध्ये सहभागी होणार आहेत.  

टॅग्स :mitएमआयटीDalai Lamaदलाई लामाPuneपुणे