राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:09 IST2021-07-30T04:09:36+5:302021-07-30T04:09:36+5:30

बारामती : गोवा येथे झालेल्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेमध्ये बारामतीच्या वीर सावरकर जलतरण तलावामध्ये सराव करणाऱ्या स्पर्धकांनी उल्लेखनीय यश ...

In the national swimming competition | राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत

राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत

बारामती : गोवा येथे झालेल्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेमध्ये बारामतीच्या वीर सावरकर जलतरण तलावामध्ये सराव करणाऱ्या स्पर्धकांनी उल्लेखनीय यश मिळविले. यावेळी सहा सुवर्णपदक आणि एक बेस्ट जलतरणपटू ट्रॉफी मिळवली.

गोवा येथे नुकत्याच तीन नॅशनल यूथ स्पोर्ट आणि एज्युकेशन इंडिया रजिस्टर बाय खेलो इंडिया आणि फिट इंडिया सपोर्ट बाय एमवायएएस गव्हर्मेंट इंडिया यांच्या सहकार्याने स्पर्धा पार पडल्या. यामध्ये महेश साळुंखे यांना दोन सुवर्णपदक आणि बेस्ट जलतरणपटू ट्रॉफी मिळाली. तसेच अजित चव्हाण यांना एक सुवर्णपदक मिळाले आणि महादेव तावरे यांना एक, श्रीमंत गायकवाड यांना दोन सुवर्णपदके मिळाली. या स्पर्धेमध्ये जलतरणपटूंनी बारामतीचे तसेच वीर सावरकर जलतरण तलावाचे नाव गोव्यामध्ये आणि राष्ट्रीय स्पर्धेमध्ये उंचावले. यशस्वी स्पर्धकांचा बारामती सायकल क्लब बारामती बॅडमिंटन क्लब वीर सावरकर स्विमिंग क्लब यांच्यातर्फे सत्कार करण्यात आला. स्पर्धकांची २० ते २५ सप्टेंबर रोजी नेपाळ काठमांडू येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत बारामतीच्या जलतरणपटूंना सहा सुवर्णपदक मिळाले.

२९०७२०२१ बारामती—०५

Web Title: In the national swimming competition