नाथाचीवाडीला झाला पंचवार्षिक सत्ताबदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 00:03 IST2018-10-03T00:03:17+5:302018-10-03T00:03:28+5:30
गेली पाच वर्षे ग्रामपंचायतीवर माजी आमदार रमेश थोरात समर्थक कार्यकर्त्यांचे वर्चस्व होते. या निवडणुकीत नवनिर्वाचित सरपंच सारिका चोरमले यांनी विद्या ठोंबरे यांचा ४०० मतांनी पराभव केला

नाथाचीवाडीला झाला पंचवार्षिक सत्ताबदल
केडगाव : नाथाचीवाडी (ता. दौंड) येथे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सत्तांतर झाले असून, आमदार राहुल कुल समर्थक जनसेवा पॅनलच्या ११ पैकी ८ जागा, तसेच सरपंचपद मिळवत ग्रामपंचायतीवर सत्ता मिळवली आहे.
गेली पाच वर्षे ग्रामपंचायतीवर माजी आमदार रमेश थोरात समर्थक कार्यकर्त्यांचे वर्चस्व होते. या निवडणुकीत नवनिर्वाचित सरपंच सारिका चोरमले यांनी विद्या ठोंबरे यांचा ४०० मतांनी पराभव केला. विरोधी माटोबा पॅनलला ३ जागांवर समाधान मानावे लागले. विजयी पॅनलचे नेतृत्व नगरसेवक रवींद्र धंगेकर, संजय ईनामके, विठ्ठल थोरात सुभान झाडगे, रामदास झाडगे, दामोदर थोरात, गोपाळ ठोंबरे, उद्धव चोरमले, लक्ष्मण चोरमले यांनी केले. पराभूत पॅनलचे नेतृत्व भाऊसाहेब आवाळे, राजकुमार थोरात, भगवान थोरात, किशोर ठोंबरे यांनी केले. विजयानंतर सर्व उमेदवारांनी ग्रामदैवत माटोबा देवाचे दर्शन घेतले. संध्याकाळी दोन गटामध्ये शाब्दीक चकमक झाल्याचे समजते. विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे -मंगल संजय ईनामके, काशीनाथ ठोंबरे, वैभव नातु, सुरेखा गंगाधर लांडगे, रोहीणी झाडगे, शांताबाई वळकुंडे, रामदास कांबळे, रंजना बर्वे, रंजित आवाळे, गंगाधर ईनामके, विजया थोरात.