शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

‘खातो नत्थी, खावा देतो नत्थी’ म्हणत मोदींनी देशाला गंडवलं - अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2019 01:41 IST

सन २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी अच्छे दिनचे सोंग घेऊन आले आणि देशातील जनतेला फसव्या विकासाचा नाद लावला. खातो नत्थी, खावा देतो नत्थी म्हणत मोदींनी संपूर्ण देशाला गंडवलं.

लोणी काळभोर -  सन २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी अच्छे दिनचे सोंग घेऊन आले आणि देशातील जनतेला फसव्या विकासाचा नाद लावला. खातो नत्थी, खावा देतो नत्थी म्हणत मोदींनी संपूर्ण देशाला गंडवलं. प्रत्येकाच्या खिशातून दीड लाखाची लूट केली, परंतु चौकीदाराने तुम्हाला त्याची भनक लागू दिली नाही. नोकरी देतो सांगून तरुणाईला फसवलं आणि जीएसटीमधून व्यापाऱ्यांचे तर नोटाबंदीने देशाचे आर्थिक कंबरडे मोडले यातून आजही देशातील जनता सावरलेली नाही, अशी परिस्थिती असल्याची टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.लोणी काळभोर (ता. हवेली) येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने परिवर्तन यात्रेनिमित्त काळभोर लॉन्समध्ये निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात शासनाची पोलखोल करताना पवार यांनी टीका केली. मेळाव्याचे अध्यक्षस्थान माजी उपमुख्यमंत्री छगन भजबळ यांनी भूषविले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्याक्ष जयंत पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, विरोध पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार वंदना चव्हाण, माजी आमदार अशोक पवार, जगन्नाथ शेवाळे, विलास लांडे, बापूसाहेब पठारे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले, पक्षाचे पुणे शहराध्यक्ष चेतन तुपे, महिला अध्यक्ष रुपाली चाकणकर, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब भोसले, पुणे महानगरपालिकेचे माजी महापौर राजपालसिंग, राजलक्ष्मी भोसले यांच्यासमवेत पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. दिलीप वाल्हेकर यांनी सूत्रसंचालन केले. सुरेश घुले यांनी आभार मानले.पुुण्याबद्दल खंंत व्यक्त करताना अजित पवार म्हणाले, की गेल्या काही महिन्यांत येथील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गुन्हेगारी अशीच वाढत राहिली तर सामाजिक शांततेला आव्हान निर्माण होऊ शकते. त्यांतूनच कामगारांवर बेरोजगारीची कुºहाड कोसळू शकते. यामुळे गुंतवणूकदार गुंतवणूक करण्यास टाळाटाळ करतील. पुणे वाढले ते आजवरच्या वेगवेगळ्या आता जुन्यांच्या नोकºया गेल्या नव्यांना मिळत नाहीत. मेट्रो प्रकल्प लांबल्याने वाहतूक व्यवस्थेची दुरवस्था झाली.जिल्ह्याला वरदान ठरू पाहत असलेल्या विमानतळाच्या जागेची निश्चिती नाही. याचबरोबर पुणेकरांच्या पाण्याचे नियोजन नाही. यांमुळे सर्व जण हवालदिल झाल्याचे चित्र दिसत आहे. यांकडे सत्ताधारी मात्र जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहेत, असे सांगून त्यांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नाला हात घातला.पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला पराभूत करण्याची ताकद विरोधकांत नाही, असे असताना पक्षातील लोकांनी विशेषत: व्यासपीठावर मिरवणाºया पदाधिकाºयांनीच निवडणुकीत ऐनवेळी गडबड केल्याने पक्षाला पुणे शहर, पिंपरी - चिंचवडसह जिल्ह्यात पराभवाचा सामना करावा लागलेला आहे. आगामी काळात येत असलेली लोकसभा व विधानसभेची निवडणूक पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी अत्यंत गांभीर्याने घेतलेली आहे. या निवडणुकीत यापूर्वी केलेल्या चुुकांची पुनरावृत्ती करणारे व पक्षात राहून गडबड करणाºयांची गय केली जाणार नाही.- अजित पवारमाजी उपमुख्यमंत्री

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNarendra Modiनरेंद्र मोदी