शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

PM Modi: नरेंद्र मोदींचे उद्या पुण्यात आगमन; टिळक पुतळ्यासमोर सर्व पक्ष, संघटनांकडून आंदोलन

By श्रीकिशन काळे | Updated: July 31, 2023 16:42 IST

आंदोलनातून मणिपूर येथील भगिनींवरच्या अत्याचाराचा जाब विचारणार

पुणे : मणिपूर मधल्या आपल्या भगिनींची नग्न धिंड काढून त्यांच्यावर बलात्कार करण्यात आला. त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्यांच्या वडील आणि भावाला मारून टाकण्यात आले. तरीही त्यावर काही बोलण्यासाठी पंतप्रधान यांना वेळ नाही. स्वतःच्याच 'मन की बात' ऐकवणाऱ्या देशाच्या पंतप्रधानांना वेळ नाही. टिळक पुरस्कार स्वीकारण्यासाठी ते उद्या १ ऑगस्ट रोजी पुण्यात येत आहेत. त्यांच्याविरोधात महत्मा फुले मंडई येथील टिळक पुतळ्यासमोर सकाळी निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. तेव्हा काळे झेंडेही दाखविणार आहेत.

हा निषेध कॉग्रेस, राष्ट्रवादी, उध्दव ठाकरे शिवसेना व इतर सामाजिक संस्थांच्या वतीने होत आहे. मणिपूरच्या घटनेविषयी तुम्ही अस्वस्थ आहात का? आपल्या देशातल्या एका भागामध्ये सुरू असलेल्या या वंशसंहाराच्या घटनांबद्दल तुम्हाला चिंता वाटते का? एकूणच देशातील केंद्र सरकारच्या कारभारामुळे सामान्य माणसाचे जीवन यातनामय झाले आहे.  याविषयी आपली तगमग होत आहे का? जर तुम्हाला तसे वाटत असेल तर आता शांत बसून चालणार नाही. 

लोकशाहीमध्ये सनदशीर शांततेच्या मार्गाने उद्या निषेध व्यक्त होणार आहे. उद्या मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुण्यात विविध कार्यक्रम आहेत. त्यांना जनतेच्या मनातील भावना कळवण्यासाठी भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक पुतळा, महात्मा फुले मंडई येथे निषेध निदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने होणार आहेत. भारतीय नागरिक म्हणून यात सहभागी व्हा आणि आपला निषेध नोंदवा, असे आवाहन सर्व संघटनांच्या वतीने करण्यात आले आहे.

टॅग्स :PuneपुणेCentral Governmentकेंद्र सरकारBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीagitationआंदोलन