शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येच्या खटल्याच्या सुनावणीस सुरूवात; पहिली साक्ष नोंदविली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2021 21:19 IST

हत्येनंतर आठ वर्षांनी शनिवारपासून खटल्याच्या सुनावणीस सुरूवात झाली आहे. या खटल्यातील पहिला साक्षीदार ज्याच्या समोर पोलिसांनी पंचनामा केला होता, त्यांची साक्ष नोंदविण्यात आली

पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर (narendra dabholkar) यांच्या हत्येनंतर आठ वर्षांनी शनिवारपासून खटल्याच्या सुनावणीस सुरूवात झाली आहे. या खटल्यातील पहिला साक्षीदार ज्याच्या समोर पोलिसांनी पंचनामा केला होता, त्यांची साक्ष नोंदविण्यात आली. त्यांनी प्रथमदर्शनीच काही वस्तू ओळखल्या. मात्र बचाव पक्षाने साक्षीदाराची उलतपासणी घेत पंचनाम्यावर सह्या केल्या होत्या. त्यात काय होते याची कल्पना त्यांना नव्हती. तसेच पूर्ण घराचा पंचनामा त्यांच्यासमोर झाला नाही असा युक्तिवाद केला. आता या खटल्याची पुढील सुनावणी १३ नोव्हेंबर रोजी होणार असून, त्यात फिर्यादी असलेले तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक नारायण रानगट यांची साक्ष नोंदविण्यात येणार आहे. विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्यान्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू आहे.

डॉ. दाभोलकर सदाशिव पेठेतील अमेय अपार्टमेंट मध्ये राहात असत. तिथे आठवड्यातून केवळ एक ते दोन वेळा ते येत होते. त्यांच्या शेजारच्या सदनिकेत अविनाश धवलभक्त राहातात. त्यांची पहिली साक्ष शनिवारी नोंदविण्यात आली. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येनंतर संबंधित सदनिकेतून त्यांच्या वापराच्या काही वस्तू पोलिसांनी हस्तगत केल्या होत्या. त्या प्रक्रियेत धवलभक्त हे पंच होते. अशी माहिती, या प्रकरणातील विशेष सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी न्यायालयास दिली.

पोलिसांनी माझ्या समोर सदनिकेत पंचनामा केला होता. त्यातील काही वस्तू मी ओळखू शकतो, असे सांगत धवलभक्त यांनी त्यावेळी जप्त करण्यात आलेल्या काही वस्तू ओळखल्या. पुस्तक, डायरी, कपडे असे काही साहित्य त्याचवेळी पोलिसांनी जमा केले होते. बचाव पक्षाच्या वतीने अँड. प्रकाश साळशिंगीकर, अॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर, अॅड. सुवर्णा आव्हाड-वस्त यांनी कामकाज पाहिले. अॅड. इचलकरंजीकर यांनी साक्षीदाराची उलट तपासणी केली.

या खटल्यास सरकारी वकिलांना सहाय्य करीत बाजू मांडण्याची संधी मिळण्याबाबत अँड. ओंकार नेवगी यांनी न्यायालयात अर्ज केला होता. त्यास न्यायालयाने मंजूर दिली आहे. अँड. नेवगी हे दाभोलकर कुटुंबीयांचे वकीलआहेत. अँड. आव्हाड यांनी डॉ. दाभोलकर यांच्या शवविच्छेदनाची सीडी आणि त्यांच्या एक्स रे ची कॉपी मिळण्याची मागणी न्यायालयात केली. न्यायालयाने सीबीआय ऐवजी आमच्याकडे या कॉपी सुपूर्द कराव्यात, असे त्यांच्या अर्जात नमूद होते. त्यानुसार न्यायालयाने संबंधित यंत्रणेस या कॉपी बचाव पक्षास उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालयNarendra Dabholkarनरेंद्र दाभोलकर