यशवंत मनोहर यांना नारायण सुर्वे जीवनगौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 01:48 IST2018-10-27T01:48:13+5:302018-10-27T01:48:16+5:30

महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेतर्फे नारायण सुर्वे यांच्या स्मृतिदिनानिमित्त देण्यात येणाऱ्या नारायण सुर्वे स्मृती पुरस्कारांची घोषणा केली.

Narayan Survey Life Care | यशवंत मनोहर यांना नारायण सुर्वे जीवनगौरव

यशवंत मनोहर यांना नारायण सुर्वे जीवनगौरव

पुणे : महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेतर्फे नारायण सुर्वे यांच्या स्मृतिदिनानिमित्त देण्यात येणाऱ्या नारायण सुर्वे स्मृती पुरस्कारांची घोषणा केली. यंदाचा नारायण सुर्वे जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांना प्रदान होईल. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्य हस्ते पुरस्कार वितरण होईल. अध्यक्षस्थान वात्रटिकाकार रामदास फुटाणे भूषविणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून विखे-पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. अशोक विखे-पाटील उपस्थित राहणार आहेत, असे सचिन ईटकर, मुख्य मानद सल्लागार महेंद्र रोकडे, अध्यक्ष उद्धव कानडे, उपाध्यक्ष रविंद्र डोमाळे यांनी कळवले आहे.
या वेळी ‘नारायण सुर्वे भला माणूस’ पुरस्कार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. गिरीश गांधी यांना, ‘नारायण सुर्वे साहित्य’ पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक विजय खरे यांना, नारायण सुर्वे स्नेहबंध पुरस्कार रयत शिक्षण संस्थेच्या एस. एम. जोशी कॉलेजचे प्राचार्य डॉ. अरविंद बुरुंगले यांना, ‘नारायण सुर्वे सनद’ पुरस्कार प्रसिद्ध कवयित्री कल्पना दुधाळ यांना आणि ‘नारायण सुर्वे कामगारभूषण’ पुरस्कार श्री खंडेराय प्रतिष्ठान शिक्षण संस्थेचे संस्थापक गणपतराव बालवडकर यांना प्रदान होईल. २९ आॅक्टोबर रोजी संध्याकाळी ५.४५ वाजता, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे सभागृहात हा सोहळा होणार आहे.

Web Title: Narayan Survey Life Care