वासुंदेच्या सरपंचपदी नंदा जांबले
By Admin | Updated: February 23, 2017 02:17 IST2017-02-23T02:17:21+5:302017-02-23T02:17:21+5:30
ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडीसाठी विद्यमान ग्रामपंचायत सदस्या नंदा प्रभाकर जांबले यांचा एकमेव

वासुंदेच्या सरपंचपदी नंदा जांबले
वासुंदे : ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडीसाठी विद्यमान ग्रामपंचायत सदस्या नंदा प्रभाकर जांबले यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने नंदा जांबले यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा मंडल अधिकारी प्रकाश भोंडवे यांनी दिली.
वासुंदे ग्रामपंचायतीच्या मावळत्या सरपंच मनीषा गोरख जांबले यांनी आपला कार्यकाळ पूर्ण झाल्याने सरपंचपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सरपंचनिवडीचा कार्यक्रम घेण्यात आला.
सरपंचनिवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पाटसचे मंडल अधिकारी प्रकाश भोंडवे यांनी, तर सहायक म्हणून गावकामगार तलाठी एच. डी. संकपाळ यांनी काम पाहिले.
ग्रामपंचायत सदस्यांमधून नंदा जांबले यांचा एकच अर्ज दाखल झाल्याने त्यांची सरपंचपदी बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.
सरपंचपदी निवड झाल्यानंतर आपणपुणे जिल्हा बँकेचे चेअरमन रमेश थोरात यांच्या
मार्गदर्शनाखाली सर्व ग्रामस्थांना बरोबर घेऊन काम करणार असल्याचे नवनिर्वाचित सरपंच नंदा जांबले यांनी सांगितले.
या वेळी मनीषा जांबले, दिलीप जगताप, दादासो माकर, अर्चना धुमाळ, मीना जांबले, वर्षा हाजबे, रोहिणी लोंढे, दत्तात्रय जांबले, राजेंद्र जगताप, बाळासो जांबले, अंकुश जांबले, बाबासो खोमणे, संजय जांबले, दिलीप जांबले, पोपट जगताप, किसन जांबले तसेच सर्व संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
(वार्ताहर)