पोंढे गावच्या सरपंचपदी नंदा वाघले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:10 IST2021-02-14T04:10:29+5:302021-02-14T04:10:29+5:30

ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत पोंढे गावचे पाच सदस्य बिनविरोध आले. उर्वरित दोन जागेत मतदान झाले. अर्ज दाखल करण्याच्या ...

Nanda became the Sarpanch of Pondhe village | पोंढे गावच्या सरपंचपदी नंदा वाघले

पोंढे गावच्या सरपंचपदी नंदा वाघले

ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत पोंढे गावचे पाच सदस्य बिनविरोध आले. उर्वरित दोन जागेत मतदान झाले. अर्ज दाखल करण्याच्या निर्धारित वेळेत सरपंच पदासाठी नंदा शामराव वाघले यांचा व उपसरपंच पदासाठी नवनाथ कुंडलिक वाघले यांचाच अर्ज आला. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी डी. जी. वाघमारे यांनी जाहीर केले.

यावेळी नवनिर्वाचित सदस्य छाया वाघले, कविता जाधव, मंदा लोखंडे, पंकज लोखंडे, दीपक गायकवाड आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. माजी सरपंच वसंत वाघले,संपत वाघले,रामदास वाघले, नारायण वाघले, पोलीस पाटील विजय गायकवाड या आदींच्या हस्ते नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्यांचा सत्कार करण्यात आला. पत्रकार दत्ता जाधव यांनी प्रास्ताविक करत निवडणूक निर्णय अधिकारी यांचे आभार मानले.

पोंढे गावच्या सरपंचपदी नंदा वाघले, तर उपसरपंचपदी नवनाथ वाघले यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

Web Title: Nanda became the Sarpanch of Pondhe village