शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

"नाना पटोले यांचा राजीनामा अनपेक्षित नाही; पण.." ; अजित पवार यांची रोखठोक प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2021 11:40 IST

सर्व निर्णय किमान समान कार्यक्रमानुसारच निर्णय घेतले जाणार..

पुणे : काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी ;आपल्या विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. यावरून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या राजीनाम्यामागे काँग्रेस अंतर्गत कुरघोडी व महाविकास आघाडीत धुसफूस असल्याची चर्चा देखील समोर येत आहे. पटोले यांच्या राजीनाम्यानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांनी आपली सावध प्रतिक्रिया दिली असली पडद्यामागे बऱ्याच घडामोडी घडत आहे. यातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी नाना पटोले यांच्या विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनाम्यावर रोखठोक भाष्य केले आहे.  

पुण्यातील एका कार्यक्रमात अजित पवार उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते. पवार म्हणाले,किमान समान कार्यक्रमानुसारच निर्णय घेतले जाणार आहे. याबाबतचा निर्णय तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते ठरवणार आहे. तसेच नाना पटोले यांनी अधिवेशनाच्या सत्रानंतर राजीनामा द्यायला हवा होता. मात्र, त्यांच्या पक्षश्रेष्ठींचा हा निर्णय आहे. त्यांच्या राजीनाम्यावरून महाविकास आघाडीत नाराजी असल्याच्या चर्चेत तथ्य नाही. पटोले यांचा राजीनामा अनपेक्षित नाही, गेली काही दिवस यावर चर्चा सुरू होती. 

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपदासाठी नाना पटोले इच्छुक होते. दोन दिवसांपूर्वी नाना पटोले यांनी काँग्रेस हायकमांडची दिल्लीत जाऊन भेट घेतली. त्यानंतर गुरूवारी त्यांनी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. काँग्रेसकडून अध्यक्षपद घेऊन त्यांना उपमुख्यमंत्रिपद देण्यात येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे, परंतु विधानसभा अध्यक्षपद आता रिक्त असल्याने ते खुले झाले आहे, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही विधानसभा अध्यक्षपदासाठी दावा केला आहे.

नाना पटोले यांच्या राजीनाम्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज? काँग्रेसमधील अंतर्गत घडामोडींमुळे महाविकास आघाडीत तणाव निर्माण झाला आहे, एकीकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी नेत्यांची लॉबी सुरू झाली असताना विधानसभा अध्यक्ष नाना पटोलेंनी राजीनामा दिला. पटोलेंच्या राजीनाम्यामुळे महाविकास आघाडीत तणाव निर्माण झाला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नाराज असल्याची माहिती आहे. त्यातच शरद पवारांनी केलेल्या विधानामुळे आघाडीतला अविश्वास वाढवण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :PuneपुणेPoliticsराजकारणNana Patoleनाना पटोलेAjit Pawarअजित पवारState Governmentराज्य सरकार