शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
5
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
6
राजा रघुवंशीच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती; कुटुंबाला आला संशय, तपास करताच धक्कादायक सत्य उघड
7
जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते!
8
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
9
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
10
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
11
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
12
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
13
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
14
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
15
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
16
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
17
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
20
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल

पुणे रेल्वे स्टेशनला 'श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे' यांचे नाव द्या; मेधा कुलकर्णी यांची मागणी

By किरण शिंदे | Updated: June 23, 2025 17:03 IST

थोरले बाजीराव पेशवे 42 लढाया लढले एकही हरले नाही, एनडीए सारख्या संस्थेत त्यांच्या युद्ध कलेचे धडे गिरवले जातात

पुणे : पुणे शहराच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाला उजाळा देण्यासाठी पुणे रेल्वे स्टेशनला ‘श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे’ यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी खासदार मेधा कुलकर्णी यांनी केली आहे. पुण्याला बाजीराव पेशव्यांसारखा इतिहासातील महान सेनानी लाभलेला असून, त्यांच्या कार्याला गौरवण्यासाठी पुणे रेल्वे स्टेशनला 'श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे' यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली.

पुणे आणि सोलापूर विभागाची रेल्वेची बैठक आज पुण्यात पार पडली. या बैठकीला त्या त्या जिल्ह्यातील सर्व खासदार उपस्थित होते. पुणे रेल्वे स्टेशन आणि पुणे शहरासंबंधित प्रश्न मी या बैठकीत उपस्थित केले. यातील एक मुद्दा होता तो म्हणजे पुणे रेल्वे स्टेशनला श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव देण्यात यावे. अशा प्रकारची मागणी अनेक संघटनांनी वेळोवेळी केली आहे. आजच्या बैठकीत मी त्याचा पुनरुचार केला आहे. कुठल्याही रेल्वे स्थानकाचा, विमानतळाचा भारतातील त्याच्या इतिहासाशी कनेक्शन जोडण्याचा प्रयत्न असतो. जेणेकरून नागरिकांनाही आपला दैदिप्यमान इतिहास कळाला पाहिजे. परंतु पुणे रेल्वे स्टेशन पाहिल्यानंतर असा कुठलाही इतिहास त्यातून प्रतिबिंबित होत नाही.

पुणे शहर हे मोठे आहे नावाजलेले आहे राजधानीच्या शहरापेक्षा कमी नाही. शिक्षणाचे माहेरघर आहे सांस्कृतिक शहर आहे शैक्षणिक शहर आहे आयटी हब आहे. त्यामुळे इतिहासाच्या संस्कृतीच्या पाऊलखुणा पुणे रेल्वे स्टेशनवर दिसल्या पाहिजेत. म्हणून पुणे रेल्वे स्टेशनला थोरली बाजीराव पेशवे यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी मी केली आहे.. दुसरा मुद्दा छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी साम्राज्याचा विस्तार अटक ते कटक करण्याचे काम थोरले बाजीराव पेशवे त्यांनी केले आहे. शनिवार वाडा देखील त्याचेच प्रतीक आहे. हिंदवी साम्राज्याचा विस्तार, मराठा साम्राज्याचा विस्तार जसा छत्रपतींच्या काळात झाला तसाच कार्य थोरले बाजीराव पेशवे यांनी देखील केले आहे. या कामात बाजीराव पेशवे यांची देखील योगदान मोठे आहे. थोरली बाजीराव पेशवे 42 लढाया लढले एकही हरले नाही. एनडीए सारख्या संस्थेत त्यांच्या युद्ध कलेचे धडे गिरवले जातात. त्यांच्या युद्ध कौशल्याचे धडे सैन्यालाही दिले जातात. छत्रपती शिवरायांचा वारसा यांनी चालवला, अटकेपार झेंडा ज्यांनी रोवला अशा थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव पुणे रेल्वे स्थानकाला देण्यात यावे अशी मागणी केली आहे.

टॅग्स :pune railway stationपुणे रेल्वे स्थानकPeshwaiपेशवाईrailwayरेल्वेmedha kulkarniमेधा कुलकर्णीhistoryइतिहासShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज