बंद कॉलेजचे नाव अकरावी प्रवेशाच्या यादीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:25 IST2021-09-02T04:25:21+5:302021-09-02T04:25:21+5:30
पुणे : पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील अकरावी प्रवेशासाठी राबविल्या जात असलेल्या आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेत एका बंद असलेल्या ...

बंद कॉलेजचे नाव अकरावी प्रवेशाच्या यादीत
पुणे : पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील अकरावी प्रवेशासाठी राबविल्या जात असलेल्या आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेत एका बंद असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयाचे नाव समाविष्ठ करण्यात आले होते. मात्र, शिक्षण विभागाकडे प्राप्त झालेल्या तक्रारीनंतर केलेल्या प्रत्यक्ष पहाणीत ते बंद असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे संबंधित महाविद्यालयाचे नाव आॅनलाईन यादीतून काढण्यात आले आहे.
पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे अकरावी प्रवेशासाठी आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. त्यासाठी मागील वर्षी नोंदणी केलेल्या कनिष्ठ महाद्यालयांची यादी जशीच्या तशी आॅनलाईन प्रक्रियेत समाविष्ठ करण्यात आली. परंतु, हडपसर येथील प्रीतम प्रकाश हे कनिष्ठ महाविद्यालय दिलेल्या पत्त्यावर अस्तित्वात नसल्याची तक्रार शिक्षण विभागाकडे प्राप्त झाली. त्यावर शिक्षण अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षात भेट देऊन महाविद्यालयाची पाहणी केली. त्यात महाविद्यालय बंद असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे या महाविद्यालयाचे नाव आॅनलाईन प्रक्रियेतून काढून टाकले आहे.
दरम्यान, अकरावी प्रवेशाची दुसरी फेरी सुरू झाली असून आत्तापर्यंत ८२ हजार ९०८ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. त्यातील ७४ हजार ६६० विद्यार्थ्यांनी अर्ज लॉक केले आहेत. तर ७३ हजार ९८५ विद्यार्थ्यांचे अर्ज तपासून झाले आहेत. दुसऱ्या फेरीसाठी २ ते ८ सप्टेंबर या कालावधीत विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे पसंतीक्रम भरता येणार आहेत.
--------------------------