छेड काढल्याच्या गैरसमजातून अल्पवयीन मुलांची नग्न धिंड

By Admin | Updated: May 19, 2017 04:34 IST2017-05-19T04:34:58+5:302017-05-19T04:34:58+5:30

मुलीची छेड काढल्याच्या गैरसमजातून अल्पवयीन मुलांची नग्न धिंड काढण्याचा धक्कादायक प्रकार कर्वेनगर येथील मावळे आळीमध्ये मंगळवारी साडेआठच्या सुमारास घडल्याचे

The naked shits of the minor children from the misunderstanding of torture | छेड काढल्याच्या गैरसमजातून अल्पवयीन मुलांची नग्न धिंड

छेड काढल्याच्या गैरसमजातून अल्पवयीन मुलांची नग्न धिंड

- लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मुलीची छेड काढल्याच्या गैरसमजातून अल्पवयीन मुलांची नग्न धिंड काढण्याचा धक्कादायक प्रकार कर्वेनगर येथील मावळे आळीमध्ये मंगळवारी साडेआठच्या सुमारास घडल्याचे उघडकीस आले आहे. पीडित मुलाच्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्या आईने दिलेल्या तक्रारीमुळे वारजे पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.
नवीन कुंदन खुराना (वय ४७), यश नवीन खुराना (वय १९), राजू पिराराम देवासी (वय २४), प्रदीप श्रीकृष्ण साळुंखे (वय ३५, सर्व रा. कर्वेनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगा व संबंधित मुलगी कोथरूडमधील एका शाळेत शिकत आहेत. हा मुलगा संबंधित मुलीची छेड काढून तिला त्रास देतो असा आरोपींचा समज झाला. मंगळवारी रात्री आठ वाजता एका मित्राला सोडण्यासाठी तो येथील मावळे आळी येथे गेला होता. पीडित मुलगा व त्याचा मित्र हे रस्त्याच्या कडेला असलेल्या बाकावर गप्पा मारत बसले होते. काही वेळाने खुराना यांच्यासोबत इतर जण तिथे आले. तुम्ही आमच्या मुलीला का छेडता, असे विचारत या दोघांनाही लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करण्यात आली. त्यांच्या अंगावरील कपडे फाडून त्यांना नग्न करून रस्त्याने मारहाण करत धिंड काढली. या मारहाणीचे व्हिडिओ
शूटिंग करण्यात आले. मारहाणीचा व्हिडीओ व्हॉट्सअ‍ॅपवरून व्हायरल झाल्यानंतर पीडित मुलाच्या आईने तो पाहिल्यावर त्यांना धक्काच बसला. त्यांनी तत्काळ वारजे पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली.

Web Title: The naked shits of the minor children from the misunderstanding of torture