शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

नागालँडमधील आमदार कामे होत नसल्याने होते अस्वस्थ : अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 14:19 IST

- सात आमदारांनी तिकडे जाण्याचा निर्णय घेतल्याने पक्षांतर्गत बंदी कायदा लागू होत नाही

पुणे : नागालँडमधील सात आमदार मला दोन-तीन महिन्यांपूर्वी भेटायला आले होते. ते प्रचंड अस्वस्थ होते. कारण त्यांची कामे होत नव्हती. याबाबत मी तिथल्या मुख्यमंत्र्यांची आणि इतर वरिष्ठ नेत्यांशी बोललो. मात्र, ते सर्व आमदार अस्वस्थ होते, ही बाब खरी आहे. वेगवेगळ्या राज्यांची जबाबदारी वेगवेगळ्या नेत्यांना दिली असून त्यांच्याकडून याबाबत अधिकची माहिती मी घेणार आहे. सर्वच्या सर्व सात आमदारांनी तिकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पक्षांतर्गत बंदी कायदा लागू होत नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. दरम्यान, राष्ट्रवादीच्या सातही आमदारांनी सत्ताधारी नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीत (एनडीपीपी) शनिवारी प्रवेश केला आहे. या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.

छत्रपती संभाजीनगर येथे एका मुलीला चटके दिल्याच्या घटनेबाबत अजित पवार म्हणाले , ‘मला तमाम लाडक्या बहिणींना सांगायचं आहे की आपण नियम आणि कायदे महिलांच्या बाजूने केलेले आहेत. त्यामुळे महिलांनी अशा घटना घडल्या तर तक्रारी केल्या पाहिजेत. आता कोल्हापुरात एक अशीच घटना घडली. एका महिलेला साखळदंडाने बांधले होते. त्यानंतर याबाबत काही लोकांनी पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकला आणि महिलेची सुटका केली. मात्र, त्या महिलेच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, त्या महिलेची मानसिक स्थिती चांगली नव्हती. त्यामुळे त्यांनी ते कृत्य केले. मात्र, मानसिक स्थिती चांगली नसेल तर मनोरुग्णांच्या हॉस्पिटलमध्ये टाकायला पाहिजे होते. पोलिस आणखी त्याबाबत तपास करत आहेत.

दरम्यान, पुण्यातील भावे हायस्कूलजवळ झालेल्या अपघाताची माहिती घेतली आहे. त्यातील काही विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे होते. त्यांच्या परीक्षेसंदर्भात त्या संस्था निर्णय घेतील. त्या कारची चावी मालकाकडून तशीच राहिली आणि पुढे कारचालकाकडून ही घटना घडली. तो चालक मद्यधुंद होता. आता या प्रकरणात एकाला रात्री अडीच वाजता अटक करण्यात आली आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.

शस्त्र परवान्याची खरंच गरज आहे का हे तपासले जाणार

पुणे शहरात दिलेल्या शस्त्र परवान्याची माहिती घेणार आहे. शस्त्र परवाना देण्याचा अधिकार आहे. तसा तो रद्द करायचा पण आहे. कुणाकुणाला शस्त्र परवाना दिला आहे याची माहिती घेऊन त्यांना खरंच गरज आहे का, हे तपासले जाईल. हुंडाबळी प्रकरणातील हगवणे कुटुंबाला पकडले आहे. त्यांच्या शस्त्र परवानाची चौकशी सुरू आहे. काही गोष्टी पोलिसांनी जप्त केल्या आहेत, त्यांना तपास करू द्या, असेही अजित पवार यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAjit Pawarअजित पवार