शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

माझा फोटो वापरला, त्यांना माहिती आहे..., आपलं नाणं चालणार नाही - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2023 16:43 IST

माझ्या निवडीचे बॅनर लावले तर शरद पवारांचा देखील फोटो लावावा, अजित पवारांचे कार्यकर्त्यांना आवाहन

पुणे : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात पुणे जिल्ह्याचा महत्वाचा वाटा आहे. कारण पुण्यातून पवारांचे राजकारण सुरु झाले आहे. या मोठ्या राजकीय घडामोडीने राजकारणात महाभूकंप झाल्याचे दिसून येत आहे. अजित पवार ३२ आमदार घेऊन उपमुख्यमंत्री झाले. या घटनेने राष्ट्रवादीतच फूट पडली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांची चांगलीच तंबी झाल्याचे कळत आहे. कोणाला साथ द्यावी याबाबत ते संभ्रमात आहेत. पण काहींनी अजित पवारांना पाठिंबा देत बॅनरबाजीला सुरुवात केली आहे. बारामतीत तर भाजप कार्यकर्त्यांनी अजित पवारांना शुभेच्छांचे बॅनर लावले आहेत. पुण्यातही आज अजित पवारांचे बॅनर लावण्यात आले आहेत. 

बारामतीत अजित पवार यांच्या सत्तानाट्याच्या दुसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बॅनरबाजीने बारामतीकरांचे लक्ष वेधले होते. कारण या बॅनरवरुन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा फोटो गायब झाला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माझ्या निवडीचे बॅनर लावले तर शरद पवारांचा देखील फोटो लावावा,असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. त्यानंतर पुण्यात अजितदादांच्या बॅनरवर शरद पवारांचा फोटो दिसून आला आहे. तसेच अजित पवारांच्या कार्यालयातही शरद पवारांचा फोटो लावण्यात आला आहे. अशातच मुंबईत झालेल्या बैठकीत बॅनरबाजीवरून अजित पवारांवर निशाणा साधला आहे. ''माझा फोटो वापरला, त्यांना माहिती आहे आपलं नाणं चालणार नाही'' असं शरद पवार म्हणाले आहेत. 

बारामतीत पवार कुटुंबीय एकत्र रहावेत

बारामतीकरांनी पवार कुटुंबियांचे एकोप्याचे राजकारण सुरुवातीपासून पाहिले आहे. बारामतीच्या इतिहासात प्रथमच या कुटुंबियांचे एकमेकांच्या विरोधी राजकारण पाहण्याची वेळ बारामतीकरांवर आली आहे. बारामतीत शरद पवारांची रणनीती कशी असेल, ज्या बारामतीच्या बळावर त्यांनी देशात ओळख निर्माण केली. त्यांच्यामुळे बारामती देशाच्या राजकारणात ओळखली जाते. त्या बारामतीचे राजकारण भविष्यात  कोणत्या दिशेने जाणार, या विचारानेच बारामतीकर धास्तावले आहेत. बारामतीत पवार कुटुंबीय एकत्र रहावेत, अशीच बहुतांश बारामतीकरांची इच्छा आहे.

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारPoliticsराजकारण