शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

वडगाव शेरीतून आज नाहीतर उद्या माझ्या नावाची घोषणा होणार; सुनील टिंगरेंचा विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2024 16:26 IST

मला पक्षाने ए बी फॉर्म दिला असून अजित दादा आणि प्रफुल्ल पटेल यांनी मलाच विधानसभा लढवण्यासाठी सांगितलं आहे

पुणे : विधानसभेच्या रणधुमाळीत पुणे जिल्ह्यात ८ ठिकाणी राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाल्यानंतर आताच चर्चेत आलेल्या वडगाव शेरीबाबत सस्पेन्स कायम राहिला आहे.  हडपसर विधानसभा मतदार संघातून महायुतीतून अजित पवार गटाला उमेदवारी मिळाल्यानंतर भानगिरेंचा पत्ता कट झाला. मात्र  वडगाव शेरीमधून महायुतीत जागावाटप आणि उमेदवारीबाबत अजूनही सस्पेन्स कायम आहे. वडगाव शेरीतून अजित पवार गटाकडून सुनील टिंगरे तर भाजपकडून जगदीश मुळीक इच्छुक आहेत. पण अजूनही त्या भागात उमेदवार देण्यात आलेला नाही. अशातच वडगाव शेरीतून आज नाहीतर उद्या माझ्या नावाची घोषणा होईल असा विश्वास टिंगरे यांनी व्यक्त केला आहे.  

टिंगरे म्हणाले, अजित दादांवरती माझा पूर्ण विश्वास आहे. मला पक्षाने ए बी फॉर्म दिलेला आहे. वडगाव शेरीत विकासाच्या मुद्द्यावर मी निवडणूक लढवणार आहे. मैत्रीपूर्ण लढतीचा प्रश्नच येत नाही. असं ठरलं तर मैत्रीपूर्ण लढत अनेक मतदारसंघात लढावं लागेल. शरद पवारांची सहानुभूती घेऊन जर कोण लढत असेल तर ते कधीच यशस्वी होणार नाहीत. माझ्यासमोरील उमेदवार आणि विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवावी. शरद पवार कालही आमच्यासाठी दैवत होते ते माझे कान पकडू शकतात माझ्या चार पिढ्याने त्यासाठी काम केलं आहे. 

आज नाही तर उद्या घोषणा होईल 

माझं अजित दादा पवार यांच्याशी बोलणं झालं आहे. प्रफुल पटेल यांच्याशी बोलणे झालेलं आहे. सर्वांनी मला विधानसभा लढण्यासाठी सांगितलय. त्यामुळे वडगाव शेरीतून आज नाहीतर उद्या माझ्या नावाची घोषणा होईल.

‘लडेंगेभी जितेंगेभी’ 

वडगाव शेरी मतदारसंघातही भाजपला बंडखोरीचा सामना करावा लागेल असे दिसू लागले आहे. माजी आमदार जगदीश मुळीक यांना पक्षाने लोकसभेचा शब्द दिला होता, मात्र उमेदवारी मिळाली नाही. त्याआधीच भाजपने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर युती केली. ही जागा त्यांच्याकडे आहे. त्यामुळे मुळीक यांची परत अडचण झाली आहे. त्यांनी पक्षाकडे ही जागा अजित पवार यांच्याकडून मागून घ्यावी अशी मागणी केली. ती पूर्ण झाली नाही तर ‘लडेंगेभी जितेंगेभी’ असे त्यांनी समाजमाध्यमांवर जाहीर केले आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४sunil tingreसुनील टिंगरेvadgaon-sheri-acवडगाव शेरीAjit Pawarअजित पवारjagdish mulikजगदीश मुळीकPoliticsराजकारण