माझे घर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:10 IST2021-05-15T04:10:31+5:302021-05-15T04:10:31+5:30
बिबवेवाडी परिसराती माझे घर - सुभाष बाफना बिबवेवाडी परिसरातील जयवर्धमान सोसायटीमध्ये आमचे टुमदार घर आहे. भविष्यातील सुमारे ४०-५० वर्षांचा ...

माझे घर
बिबवेवाडी परिसराती
माझे घर - सुभाष बाफना
बिबवेवाडी परिसरातील जयवर्धमान सोसायटीमध्ये आमचे टुमदार घर आहे. भविष्यातील सुमारे ४०-५० वर्षांचा विचार करून या घराची बांधणी करण्यात आली आहे.
मला दोन मुले आहेत. या दोघांनी म्हटलं तर एकत्र कुटुंब अथवा दोन वेगवेगळ्या घरात राहता येईल अशा प्रकारचा सुवर्णमध्य काढला आहे. सुमारे ८ हजार चौरस फुटांच्या भूखंडावर या बंगल्याचे बांधकाम करण्यात आले आहे. तळमजल्यावर पार्किंगसह ऐसपैस उद्यानाची रचना करण्यात आली आहे. त्यावर प्रत्येकी ५००० चौरस फुटांचे डुप्लेक्स बांधण्यात आले आहेत. दोन्हींकरिता पार्किंग, उद्यान, लिफ्ट आणि टेरेस हे कॉमन आहेत. या चार मजली डुप्लेक्समध्ये मोकळ्याढाकळ्या लिव्हिंग रूम, बेडरूम आहेत. एकूण १० बेडरुम असल्यामुळे मुलांना तसेच नातवांनादेखील नवीन घर बांधावे लागणार नाही, असे नियोजन करून घरबांधणी करण्यात आली आहे.
संपूर्ण डुप्लेक्सकरिता लार्सन अॅण्ड टुब्रो कंपनीची अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा बसविण्यात आली आहे. अॅटोमेशनद्वारे घरातील दिवे, पंखे यांचे नियंत्रण केले जाते.
डुप्लेक्समुळे दोन वेगवेगळी घरं वाटत असली तरी दररोज संध्याकाळी आम्ही तळमजल्यावर उद्यान परिसरात एकत्र येतो. प्रसंगी क्रिकेट, टेनिस, बॅडमिंटन खेळू शकतो. त्यामुळे संयुक्त कुटुंब पद्धतीतच राहत आहोत, याचा भास होतो.
माझे घर शहराच्या मध्यवर्ती भागात असल्यामुळे साधूसंतांचे नित्य येणेजाणे असते. त्यामुळे घराला एक पावित्र्य लाभले आहे. तळमजल्यावरच्या जागेवर तब्बल ८ हजार चौरस फूट इतकी जागा असल्यामुळे छोटा मोठा कार्यक्रम येथे घेता येतो.
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात दोन्हीमध्ये ही एकाच कॅम्पसमध्ये राहत असल्यामुळे दोघांना एकमेकांचा आणि आम्हाला दोन्ही मुलांचा आधार सुखावून जातो.